Climate Change Alert Saam TV
महाराष्ट्र

Climate Change Alert : 2000 वर्षात असं कधीच घडलं नाही; आता नद्याही आटणार, शेती सोडा पिण्यासाठीही पाणी उरणार नाही

Climate Change : दुष्काळ वारंवार उद्भवेल. शेती-पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल.

डॉ. माधव सावरगावे

Climate Change : हवामान बदलाचे धोके आता अधिक वाढत आहेत. या धोक्यांमुळे पुढच्या काही काळात नद्या आटून जातील आणि शेतीसाठी अजिबात पाणी उरणार नाही, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. कारण सध्या जितकी उष्णता आहे, तितकी गेल्या २००० नव्हती, याचे दुष्परिणाम हळूहळू दिसू लागतील.

काही वर्षात नद्या आटून जातील. दुष्काळ वारंवार उद्भवेल. शेती-पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण वैज्ञानिकांनी धोक्याचा इशारा दिला आहे. कारण संपूर्ण जग सध्या भनायक हवामान संकटाकडे वाटचाल करत आहे. अनेक देशांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. कारण गेल्या ५० वर्षात जितकं तापमान वाढलंय तितकं २००० वर्षात कधीच वाढलेलं नाही. कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण गेल्या २० वर्षात सर्वोच्च पातळीवर आहे. (Latest News Update)

हवामान संकटाचा टाइम बॉम्ब केव्हाही फुटू शकतो. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनिओ गुटेरेस यांनी म्हटलं की हवामान संकटाचा टाइमबॉम्ब फुटला तर जगातील अनेक देशांमध्ये भयाण परिस्थिती उद्भवेल. कारण वाढत्या तापमानामुळे हिमनग वितळतील. नद्या आटून जातील आणि शेतीसाठी अजिबात पाणी उरणार नाही. आपल्याकडे आता खूप कमी वेळ बाकी आहे जेणेकरुन पृथ्वीला मोठ्या संकटातून वाचवू शकतो, असं हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी म्हटलं.

हवामान बदलाचा धोका वाढू नये यासाठी सर्व विकसीत देशांनी २०४० पर्यंत झीरो उत्सर्जनचं लक्ष्य पूर्ण करायला हवंय, असं IPCC च्या रिपोर्टमध्ये सांगितलंय. २०३० पर्यंत म्हणजे येत्या ७ वर्षात कार्बन उत्सर्जन अर्ध्यावर आणावं लागणार आहे. जेणेकरुन तापमानात जास्तीत जास्त १.५ डिग्रीच वाढ होऊ शकेल.

सध्याचं तापमान १९०० सालच्या तुलनेत १.१ डीग्री सेल्सियसनं जास्त आहे. २०१८ साली आयपीसीसीनं इशारा देऊनही कार्बन उत्सर्जन रोखता आलं नाही, उलट ते वाढताना दिसतंय.आता तापमान सातत्यानं वाढत आहे. गेल्या वर्षातच उष्णतेत १ टक्क्यानं अधिक वाढ झालीय. त्यासाठी जगभरातील देशांना आता आपलं कार्बन बजेट वाढवावं लागणार आहे.

प्रत्येक देशानं आता जीवाश्म इंधनात कपात करावी लागणार आहे. हरित ऊर्जेवर भर द्यावा लागणार आहे. तसंच लो-कार्बन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन द्यावं लागेल. शेती आणि जंगलांची वाढ करावी लागेल.

जर जगाचं तापमान १.५ डीग्रीनं वाढलं तर जमीन, समुद्र आणि हिमनगांवर परिणाम होईल. ज्यापद्धतीनं जागतिक तापमान वाढीचे शिकार आपण होत आहोत ते पुन्हा व्यवस्थित करणं आता शक्य नाही. जागतिक तापमान वाढ संपूर्ण पृथ्वीवर भयानक बदल होतील. यानं अशा आपत्ती येतील ज्यांपासून वाचणं अशक्य आहे. त्यामुळे भविष्यातील अडचणींना डोळ्यासमोर ठेवून आखण्यात येणाऱ्या उपायांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असं औंधकर यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT