Virar Railway Station : विरार येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विरार रेल्वे स्थानकात एका कुटुंबाचा अपघात झाला आहे. या अपघातात कुटुंबातील तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झालाय. विरारमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये एक पुरुष, महिला व तीन महिन्यांचा बाळाचा समावेश आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,रेल्वे रुळ ओलांडताना वेगात येणाऱ्या मेलने तिघांना जोरदार धडक दिली व महिला पुरुष आणि तीन महिन्याच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. रेल्वेने प्रवास करताना तेथील नियमांचे पालन करावे अशा सूचना सातत्याने दिल्या जातात. मात्र तरी देखील अनेक व्यक्ती रेल्वेने प्रवास करताना ते नियम सर्रास मोडतात. नियमांचे उल्लंघन केल्याने या चूका आजवर अनेकांच्या जीवावर बेतल्या आहेत. मात्र तरी देखील नागरिक आपला जीव धोक्यात टाकून रेल्वे रुळ ओलांडतात.
प्रवासात पटकन एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी नागरिक सोपा मार्ग म्हणून रेल्वे रुळातून जातात. अशात भरधाव वेगात समोरुन ट्रेन आल्यावर काय करावे आणि काय नाही हे पटकन सुचत नाही. रेल्वे अपघातात विरारमधील संपूर्ण कुटुंब गेल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना विरार रुळ क्रमांक ४ येथे रात्री १२.वाजून ४ मिनीटांनी हा अपघात झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अजीतकुमार मंगरू पटेल (वय २८) हा तरुण आपल्या कुटुंबासह सुरतला गेला होता. वसई येथे एका नटबोल्ड बनविणाऱ्या कंपनीत तो काम तो करायचा. बुधवारी बाळांतीन झालेली आपली पत्नी सिमादेवी पटेल (वय २६) आणि तीन महिन्याचा मुलगा आर्यन याला वसईच्या घरी आणण्यासाठी तो सुरतला गेला होता.
दुसऱ्या दिवसी गुरुवारी सुरत विरार मेलने तो विरारला आला होता. ही मेल विरार रेल्वे स्थालकात फलाट क्रमांक ५ वर आल्याने तो विरूध्द दिशेने उतरला होता. त्याला वसईला जायचे असल्याने विरार स्थानकातून त्याला लोकल ट्रेन पकडायची होती. यावेळी त्याने रेल्वे रुळ क्र.४ वरून रस्ता ओलांडण्याचा निर्यण घेतला आणि या निर्णयानेच त्याच्या कुटुंबाचा घात केला. गुजरातच्या दिशेने जाणारी पुणे वेरानवेल एक्सप्रेस याचवेळी या मार्गावरून धावत असताना अजीत कुमार, सिमादेवी आणि ३ महिन्याचा आर्यन या एक्सप्रेसच्या खाली आले. तसेच जागीच त्या तिघांचा मृत्यू झाला.
वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ' सदर घटना रेल्वे स्थानकाच्या पुढे झाल्याने तिथे अंधार होता. त्यामुळे त्याचे कॅमेऱ्यात चित्रिकरण झाले नाही. नातेवाईकांच्या मदतीने मयतांची ओळख पटली असून शासकीय प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.