Eknath Shinde News: 'पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नाही...' CM शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले; सावरकरांचा अपमान देशद्रोह...

Maharashtra Politics: आमचे फोटो लावून खोके, मिंधे म्हणणं कुठल्या आचारसंहितेत बसतं?" असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.
Eknath shinde News
Eknath shinde News saam tv
Published On

Maharashtra Assembly Budget Session: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. काल विधिमंडळ आवारात कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आले होते. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. या प्रकारानंतर कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली होती.

विधिमंडळ आवारात अशा प्रकारचे कृत्य अशोभनीय असल्याचे सांगत कॉंग्रेस नेत्यांनी मोठा गदारोळ केला होता. यावर विधानसभा अध्यक्षांनी माहिती घेऊन कारवाई करू असं म्हटलं. परंतु त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेत विरोधी पक्षांना खडेबोल सुणावले आहेत.

Eknath shinde News
ED And CBI: मोठी बातमी! ईडी CBI विरोधात विरोधक एकवटले; कॉंग्रेस, NCP सह 14 पक्षांची सुप्रीम कोर्टात याचिका

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

सत्ताधारी पक्षाने केलेल्या आंदोलनाविरोधात कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही (Eknath Shinde) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. "विधीमंडळाच्या आवारात जे काही घडलं त्याचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु ज्या लोकांनी गेल्या आठ महिन्यांपासून आमचा अपमान केला ते योग्य होतं का? आमचे फोटो लावून खोके, मिंधे म्हणणं कुठल्या आचारसंहितेत बसतं?" असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.

तसेच याबद्दल पुढे बोलताना "जर आमच्या पंतप्रधानांचा (Narendra Modi) अपमान करणार असाल, तर या देशातील जनता आणि आम्ही सहन तो सहन करणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. बोलताना सर्वांनी तारतम्य बाळगलं पाहिजे," असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Eknath shinde News
Nandurbar News: सोने मिश्रित माती चोरीचा उलगडा; आंतरराज्यीय टोळीकडून १० लाखांच्या मुद्देमाल जप्त

"लोकशाही धोक्यात असेल तर भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) कशी काढली? जम्मू काश्मीरमध्ये झेंडा फडकावला ना? असे सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला केले. इंदिरा गांधी (Indira Gandhi) या पंतप्रधान होत्या. त्यांचाही आम्ही अभिमान बाळगतो, असे म्हणत पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नाही," अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केला. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com