acid attack on passenger eyes Saam Tv
महाराष्ट्र

Badlapur News : ५ रूपये नाही... शौचालय चालक संतापला; बेदम मारहाण करत प्रवाशावर फेकलं अॅसिड, बदलापूर रेल्वे स्थानकातील घटना

Cleaning worker acid attack on passenger eyes in Badlapur : बदलापूरमध्ये एका रेल्वे प्रवाशाच्या डोळ्यात अॅसिड फेकल्याची घटना घडली. कल्याण लोहमार्ग पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Rohini Gudaghe

अजय दुधाणे, साम टीव्ही बदलापूर

बदलापूर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका प्रवाशाने रेल्वे स्थानकावरील शौचालयाचा वापर केला, परंतु शौचालय चालकास देण्यासाठी त्याच्याकडे पाच रूपये नव्हते. यामुळे संतापलेल्या शौचालय चालकाने प्रवाशाच्या डोळ्यात अॅसिड फेकलंय. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केलाय.

कशी घडली घटना ?

याबाबत सविस्तर वृत्त असं की, रेल्वे स्थानकातील शौचालयाचमध्ये गेलेल्या एका २८ वर्षीय युवकाने ५ रुपये सुट्टे नसल्याचं बोलताच शौचालय चालक आणि त्याच्या १५ वर्षीय अल्पवीयन मुलाने त्या तरुणाला बेदम मारहाण (Badlapur railway station) केली. त्याच्या चेह्राऱ्यावर (अॅसिड ) बाथरूम क्लिनर द्रव फेकून डोळयाला गंभीर दुखापत केलीय. ही घटना बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन वर असलेल्या शौचालयात ही घडली आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी शौचालय चालक योगेशकुमार चंद्रपालसिंग (वय ४७ ) याला अटक केलीय, तर त्याच्या १५ वर्षीय अल्पवीयन मुलाला ताब्यात घेतलं (Badlapur news) आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेशकुमार हा बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन वरील शौचालय चालवणारा ठेकेदार आहे. तर तक्रारदार विनायक बाविस्कर हे बदलापूर पश्चिम भागातील गोकुळधाम कॉप्लेक्समध्ये कुटूंबासह राहत आहे.

आरोपी बाप-लेक पोलिसांच्या ताब्यात

विनायक बाविस्कर १९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास बदलापूर स्थानकातील शौचालयाचमध्ये गेला (crime news) होता. बाहेर आल्यानंतर आरोपी बाप-लेकाने विनायककडे शौचालयाचा वापर केल्याबद्दल ५ रुपयाची मागणी केली. मात्र, विनायककडे सुट्टे ५ रुपये नसल्याने त्याने नकार दिला. त्यामुळं वाद होऊन आरोपी बाप-लेकानी मिळून त्याला बेदम मारहाण केली. १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने विनायकच्या चेहऱ्यावर बाथरूम साफ करण्यासाठी असलेलं अॅसिड फेकलं. या हल्ल्यात त्याच्या डोळ्याला गंभीर इजा (acid attack on passenger) झालीय. त्याचावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आरोपी बाप लेकाला ताब्यात घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT