Poonch Terror Attack
Poonch Terror AttackANI

Poonch Terror Attack: पूंछ दहशतवादी हल्ल्यात मोठी कारवाई; ४ स्थानिक ताब्यात, चौकशी सुरू

Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी मोठी अपडेट समोर आलीय. राजौरी येथे लष्काराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याप्रकरणी चार स्थानिक नागरिकांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
Published on

Poonch Terror Attack :

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी मोठी अपडेट समोर आलीय. राजौरी येथे लष्काराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याप्रकरणी चार स्थानिक नागरिकांनी ताब्यात घेण्यात आले आहे. (Latest News)

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारतीय लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. राजौरीमध्ये लष्कराच्या वाहनावर हल्ला झाला होता. याप्रकरणात ४ स्थानिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. काही स्थानिकांनी दहशतवाद्यांची मदत केल्याचा आरोप केला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुरुवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यात ५ जवान शहीद झाले आणि दोन जण जखमी झाले. यानंतर सुरक्षा दलाकडून घटनास्थळी घेराव घालण्यात आला असून शोधकार्य केलं जात आहे. सुत्रानुसार,काही स्थानिक लोकांनी दहशतवाद्यांची मदत केली असा संशय पोलीस आणि तपास यंत्रणेला आहे.

१६ व्या कोर च्या जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी घटनास्थळी भेट दिली. या परिसरावर हवेतून लक्ष ठेवलं जात आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी श्वास पथक तैनात करण्यात आले आहे. गुरुवारी पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय लष्करच्या वाहनांवर हल्ला केला होता. यात ५ लष्कर जवानांना वीर मरण आले तर दोन जण जखमी झाले आहेत. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरनकोट पोलीस ठाण्यांतर्गत ढेरा की गली आणि बुफलियाज दरम्यानच्या धत्यार वळणावर दुपारी ४.४५ च्या सुमारास लष्कराच्या जवानांना घेराव घातला आणि लष्करी वाहनांवर हल्ला करण्यात आला.

Poonch Terror Attack
J&K Terrorist Attack: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा हल्ला, तीन जवान शहीद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com