Shocking Viral Video
Dog Attack VideoSaam Tv

Dog Attack Video : मोबाइलवर बोलत असताना तरुणावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; चेहऱ्याचा लचका तोडला, भयानक VIDEO व्हायरल

Shocking Viral Video : काही दिवसांपासून कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भयानक घटना आपल्या समोर येत आहेत, या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अने वेळा काही व्यक्तींचे जीवही गेले आहेत. मात्र पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे मात्र सध्या याचा सीसीटीव्ही व्हायरल होत आहे.
Published on

सध्या प्रत्येक शहरात मोकाट कुत्र्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रत्येक व्यक्तीसा प्रचंड त्रास सहन करावा लागते आहे. मोकाट कुत्रे रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तींवर धावून जात हल्ले करीत आहेत. गेल्या अनेक महिन्यात आपण अशा असंख्य घटना पाहिल्या आहेत.अशात एका पिसाळलेल्या कुत्र्याने उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरातील सुमारे १७ जणांता चावा घेतल्याची घटना घडली.

Shocking Viral Video
Shocking Viral Video : सार्वजनिक ठिकाणी तरुणाचा थरारक अदांज; केल असे काही कृत्य की लोक घाबरून पळू लागले; पाहा VIDEO

गोरखपूर (Gorakhpur)शहर नव्हे तर प्रत्येक शहरात गेल्या काही वर्षांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतही एका बालिकेला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली होती.पंरतू आता गोरखपूरमधील एका परिसरात १४ ऑगस्ट दिवशई एका कुत्र्याने काही १७ जणांना चावा घेतला आहे मात्र त्यातील एका घटनेचा सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे,ज्यात एका तरुणाच्या तोंडाला चक्क कुत्र्याने चावा घेतला आहे.

व्हायरल सीसीटीव्ही

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये एक तरुण घराबाहेर मोबाईलवर बोलताना दिसत आहे.मात्र तेवढ्यात एक कु्त्रा येतो आणि तरुणाच्या अंगावर धावून जातो. व्हिडिओत पूर्णपणे दिसत आहे की, तरुण त्या कुत्र्यापासून(Dog) स्वता:ला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय,मात्र कुत्रा तरुणाला चावण्याचा प्रयत्न करतो. शेवटी तरुणाने पायाला मारुन कुत्र्याला लांब करण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात कुत्र्याने तरुणाच्या तोंडाला चावा घेतो.ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

गोरखपूरमधील धक्कादायक घटना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इस्टाग्रावरील@saamtv या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये''गोरखपूरमध्ये मोकाट कुत्र्याचा १७ जणांना चावा''असे लिहिण्यात आलेले आहे.व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर शेअर होताच मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Shocking Viral Video
Shocking Viral Video : अरेरे! घाई महिलेला नडली; फेरीबोटीतून उतरताना वाचला थोडक्यात जीव; धक्कादायक VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com