अभिजीत दीपकेच्या सुरक्षेबाबत आई अनिता दीपके यांनी व्यक्त केली चिंता
दिल्ली पोलिसांवर अभिजीत दीपकेच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप
अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुटका करण्यात आली
अभिजीत दीपके यांना आजीच्या अंत्यविधीला पोहोचता आले नसल्याने आईने केला पोलिसांवर गंभीर आरोप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. आज त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजार करण्यात आले आहे. त्यांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशामध्ये अभिजीत दीपके यांच्या आईने मुलाविषयी चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे पण दिल्ली पोलिस अभिजीतसोबत काहीही करू शकतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दिल्लीतील आंदोलनासाठी दिल्ली विमानतळावर पोहचताच अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हापासून आपला अभिजीतसोबत संपर्क झाला नाही. दिल्ली पोलिसांकडून अभिजीत यांना धोका असल्याचा गंभीर आरोप त्याची आई अनिता दिपके यांनी केला आहे. 'महाराष्ट्र पोलिसांवर आपला विश्वास आहे मात्र दिल्ली पोलिसांवर नाही.' असं म्हणत अभिजीत दिपके यांची आई ढसाढसा रडली.
तर पोलिसांनी अभिजीतचा मोबाईल काढून घेतला आहे. त्यांच्या सहकाऱ्यांना देखील वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहे. म्हणत वडिलांनी देखील गंभीर आरोप केले आहेत. काल सकाळी अभिजीत यांच्या आजीचे हिंगोलीमध्ये निधन झाले. आजीच्या अंत्यविधीसाठी आई-वडील हिंगोलीमध्ये पोहोचले आहेत. मात्र 'अभिजीतला पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे अंत्यविधीला पोहोचू शकत नाही, आजीचं निधन झाल्याची बातमी अभिजीतला समजली तर तो नक्की येईल.' असं देखील आई-वडील म्हणाले आहेत.
दरम्यान, अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांनी काल ताब्यात घेतल्यानंतर आज त्यांची जामीनावर सुटका केली आहे. मात्र अभिजीत यांच्या आजीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी पोहोचू न देणाऱ्या दिल्ली पोलिसांचा त्यांच्या आईने निषेध केला आहे. 'काल अभिजीत दीपके यांना सोडले असते तर आज आजीच्या अंत्यसंस्कारात पोहोचला असता. त्याला आजीच्या निधनाबद्दल कुणीच सांगितले नाही.', असे त्या म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.