Abhijit Dipke government surveillance allegation Saam TV Marathi
महाराष्ट्र

Abhijit Dipke : सरकार पाळत ठेवतंय, दिपकेंचा गंभीर आरोप, अमेरिकन कंपनीकडून हेरगिरीचा दावा

Abhijit Dipke, CJP Founder : CJP संस्थापक अभिजीत दिपकेंनी सरकार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अमेरिकन AI स्टार्टअपने आपली वैयक्तिक माहिती भारत मंडपममधील कार्यक्रमात प्रदर्शित केल्याचा दावा त्यांनी केला.

Namdeo Kumbhar

Abhijit Dipke government surveillance allegation : आता बातमी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या मोठ्या आरोपाची...सरकार पाळत ठेवत असल्याचा आरोप दिपकेंनी केलाय. हा आरोप का केलाय? नेमकं दिपकेंच्या घराबाहेर काय घडलं? दिपकेंच्या घरावर कुणाची नजर? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये.....

देशातील शिक्षणव्यवस्था बदलण्यासाठी सीजेपीनं नुकतीच नवी रणनीती आखली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलाय. नवी दिल्लीतील भारत मंडपममधील कार्यक्रमात वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याचा गंभीर आरोप दिपकेंनी केलाय. सरकार अमेरिकन कंपनीच्या मदतीनं माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा दावा अभिजीत दिपकेंनी केलाय. अभिजीत दिपकेंनी पोस्टमध्ये नेमका काय दावा केलाय ते पाहूयात...

अमेरिकेची मदत, सरकारची पाळत?

माझी माहिती एका अमेरिकन AI स्टार्टअपद्वारे प्रदर्शित करण्यात आली. भारत मंडपममध्ये होणाऱ्या फ्युचर क्राईम समिट 2026 दरम्यान त्यांचं AI टूल प्रदर्शित करणार आहे. शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मला सांगितल्यानुसार, हे अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडलं. सरकार आपल्यावर हेरगिरी करण्यासाठी अमेरिकन कंपन्यांची मदत घेतंय का? माझी वैयक्तिक माहिती दाखवण्याची परवानगी कुणी दिली?

तर दुसरीकडे, अभिजीत दिपकेंच्या छत्रपती संभाजीनगरमधील घराबाहेर साध्या वेशात पोलीस अधिकारी पाळत ठेवत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे अभिजीत दिपकेंनी या अधिकाऱ्यावर आक्षेप घेत त्यांना सुनावलंय. नेमकं काय घडलं ते पाहूयात....

खरंतर, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंनी नुकतीच देशव्यापी कॅम्पेनची घोषणा केलीये. 'क्या बोलती पब्लिक?' या मोहिमेच्या माध्यमातून सीजेपी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. मात्र, त्याआधीच सरकार पाळत ठेवत असल्याचा आरोप आणि संभाजीनगरातील घराबाहेरील हेरगिरीचा आरोपमुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : राज्यात विजांसह मुसळधार पाऊस, नाशिकसह ७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: पुण्यात डेंग्यूचे ६७१ संशयित रुग्ण, जुलै अखेर २७ जणांना लागण

संभाजीनगरमध्ये शाळेत चाकू हल्ला, 10वीच्या विद्यार्थ्यानं 4 वर्गमित्रांना भोसकलं

Fact Check: CJP कार्यकर्त्यांची धरपकड केली जातेय? व्हायरल व्हिडीओचं नेमकं सत्य समोर

E20 आता राहुल गांधींच्या टार्गेटवर, 'E20 मुळे स्कूटर, कार खराब होतात'

SCROLL FOR NEXT