Fact Check: CJP कार्यकर्त्यांची धरपकड केली जातेय? व्हायरल व्हिडीओचं नेमकं सत्य समोर

CJP Protest Fact Check : CJP आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साम टीव्हीच्या पडताळणीत हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले आहे.
CJP Protest Fact Check
CJP Protest Fact Check
Published On

नमस्कार मी शिवाजी शिंदे...व्हायरल सत्य-असत्यमध्ये आपलं स्वागत...आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता CJPच्या आंदोलकांना पकडून पोलीस स्टेशनला आणलं जातंय असा दावा करण्यात आलाय...याचा व्हिडिओही व्हायरल करण्यात आलाय...पण, खरंच सीजेपीच्या आंदोलकांची धरपकड सुरू आहे का...याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

या व्हिडिओत आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत असल्याचं दिसतंय...आंदोलकांना पकडून पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातंय...पण, खरंच हे CJPचे आंदोलक आहेत का...? व्हिडिओ व्हायरल करून दावा करण्यात आलाय त्यात तथ्य आहे का...? खरंच आंदोलकांची धरपकड केली जातेय का...?

CJP Protest Fact Check
E20 आता राहुल गांधींच्या टार्गेटवर, 'E20 मुळे स्कूटर, कार खराब होतात'

...सध्या देशभरात CJPच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेयत...तर काहींना माफी मागायला लावत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत...त्यातच हा आंदोलकांची धरपकड करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने सीजेपीच्या आंदोलकांना अटक केल्याचा दावा केलाय...हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होतोय...त्यामुळे नक्की हा व्हिडिओ कुठला आहे...? आंदोलकांना ताब्यात घेतलं जातंय ते कुठले आहेत...? खरंच हे सीजेपीचेच आंदोलक आहेत का...? त्यांना धमक्या दिल्या जातायत का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

CJP Protest Fact Check
Today's Horoscope : शनिदेवाची कृपा राहणार, या राशिंवर पडणार पैशांचा पाऊस; वाचा शनिवारचे राशिभविष्य

पोलीस ताब्यात घेत असलेले आंदोलक CJPचे नाहीत

व्हायरल व्हिडिओ दिल्लीतील 14 फेब्रुवारीच्या घटनेचा

AISA सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं

व्हायरल व्हिडिओचा CJP आंदोलकांशी काहीही संबंध नाही...CJP आंदोलकांची धरपकड करत असल्याचा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत CJP आंदोलकांना अटक केल्याचा दावा असत्य ठरलाय...

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com