ABHIJIT DIPKE CREDITS SONAM WANGCHUK FOR NEET PAPER LEAK PROTEST SUCCESS Saam Tv
महाराष्ट्र

Abhijeet Dipke : जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशाचं क्रेडिट कोणाचं? अभिजित दीपकेंनी स्पष्टच सांगितलं

Abhijeet Dipke Saam Tv Interview : नीट पेपरफुटी आंदोलनाच्या यशाचं संपूर्ण श्रेय सोनम वांगचुक यांना असल्याचं CJP संस्थापक अभिजित दिपके यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

Alisha Khedekar

  • नीट पेपरफुटी आंदोलनाच्या यशाचं संपूर्ण श्रेय अभिजित दिपके यांनी सोनम वांगचुक यांना दिलं

  • दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सलग ३६ दिवस सुरू होतं

  • सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांसोबत २६ दिवस उपोषण करून आंदोलनाला बळ दिलं

  • CJP ने सरकारपुढे ठेवलेल्या तीन प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर आंदोलन यशस्वी

महाराष्ट्रातील नीट पेपरफुटी प्रकरणानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. याचे पडसाद फक्त राज्यापुरते मर्यादित राहिले नाही तर देशभर उमटले. या पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाईने आंदोलन छेडले. या आंदोलनात अनेक राज्यातून विद्यार्थी आले होते. या आंदोलनातून CJP ने सरकारपुढे ३ महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या होत्या. या तिन्ही मागण्या सरकारने मागण्या केल्या आणि आंदोलनाला यश मिळालं. मात्र या यशस्वी आंदोलनाचं संपूर्ण क्रेडिट अभिजित दिपके यांनी सोनम वांगचुक यांना दिलं. अभिजित दिपके यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सोनम वांगचुक यांना गांधीवादी म्हणत त्यांच्या त्यागाचं विशेष कौतुक केलं

दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी तब्बल ३६ दिवस आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान अनेक अडचणींना त्यांनी तोंड दिल. मात्र या आंदोलनात विद्यार्थ्यांसोबत शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा देखील मोलाचा वाटा होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात त्यांच्या सोबत राहून त्यांनी तब्बल २६ दिवस उपोषण केलं. साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांनी CPJ चे संस्थापक अभिजीत दिपके यांची 'ब्लॅक अँड व्हाईट' मुलाखत घेतली. दिपके यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला आहे. दिपके म्हणाले , सोनम वांगचुक यांच्या पत्नीसोबत माझा फारसा कॉन्टॅक्ट झाला नाही. मात्र सोनम वांगचुक हे गांधीवादी आहेत. ते खूप सॉफ्ट आहेत. आज जे आंदोलन यशस्वी झालं त्याचं सगळं क्रेडिट मी त्यांना देतो. कारण स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी देशाला जाग केलं आहे. "

वांगचुक यांनी केलेलं उपोषण साधीसुधी नाही असं म्हणत दिपके यांनी महात्मा गांधी यांनी केलेल्या २१ दिवसांच्या उपोषणाचं उदाहरण दिल. ते म्हणाले, " महात्मा गांधी यांनी २१ दिवस सर्वात मोठं उपोषण केलं होत, मात्र ते लिंबू घेऊन केलं गेलं. वांगचुक यांनी फक्त मिठावर उपोषण सुरु ठेवलं होत आणि ते अत्यंत कठीण आहे. जर सोनम सरांचा मृत्यू झाला असता तर त्यांनी कॉम्प्रोमाईज केलं नाही असं मानलं असत? पण २६ दिवस उपोषण करणं किती मोठी गोष्ट आहे मला ३ दिवस उपोषण करून समजलं असल्याचं दिपके म्हणाले.

मला कोणीही ओळखत नाही पण जे काही झालं ते वांगचुक यांच्यामुळे झालं आणि २० जुलैला लाठीचार्ज झाला त्यानंतर हे आंदोलन फक्त CJP किंवा सोनम वांगचुक यांच्या पलीकडे जाऊन या देशातील लोकांचं झाल्याचं दिपके यांनी मुलाखतीत म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT