CJP LEADERSHIP CONTROVERSY: YOUTH ACTIVISTS BEGIN HUNGER STRIKE Saam tv
महाराष्ट्र

Abhijeet Dipke : "CJP च्या टीममध्ये सिलेक्टेड लोक " छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दीपकेंविरोधात आंदोलन

CJP Abhijeet Dipke Controversy : CJPच्या कार्यपद्धती आणि नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित करत मनीष ब्रह्मभट व राहुल पांड्या यांनी छत्रपती संभाजीनगरात उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून CJPच्या टीम निवडीवरही आरोप करण्यात आले आहेत.

Alisha Khedekar

  • CJPच्या कार्यपद्धती आणि नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित

  • मनीष ब्रह्मभट व राहुल पांड्या यांनी छत्रपती संभाजीनगरात उपोषण सुरू केले

  • आंदोलनाचा आज तिसरा दिवस

  • CJPच्या टीम निवडीवरही आरोप

माधव सावरगावे, संभाजीनगर

कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित करत मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या या दोन तरुणांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, त्यांनी CJPचे नेतृत्व करणाऱ्या अभिजीत दिपके यांच्यावर मनमानी कारभाराचे आरोप केले आहेत.

देशातील तरुणाईच्या प्रश्नांसाठी सुरू असलेले आंदोलन काही मोजक्या व्यक्तींपुरते मर्यादित ठेवले जात असल्याचा आरोप मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या यांनी केला. आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना, निवडक दहा-बारा जणांचीच टीम तयार करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. मनीष आणि राहुल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, हे देशाचे आंदोलन आहे चेहऱ्याचं नाही, त्यामुळे देशातून जेवढ्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला ते यामध्ये सामील असायला पाहिजे. यांच्या टीममध्ये जुने मित्र, कॉलेजचे मित्र यांच्या गाड्यांच्या आजूबाजूने फिरणारे, यांना गाडीमध्ये घेऊन जाणारे पाणी पाजणारे अशा लोकांना यांनी कमिटीमध्ये घेतले आहे. त्यांच्या गर्लफ्रेंड देखील त्यामध्ये आहेत. आम आदमी पार्टीचे अनेक चेहरे त्यामध्ये आहेत, यांनी यांच्या एकमेकांच्या गर्लफ्रेंडला कमिटी मध्ये घेतले देश गर्लफ्रेंडचे नेतृत्व स्वीकारणार का? असा सणसणीत सवाल केला आहे.

तसेच बैठकीत आम्हाला सहभागी करून घेण्यात आले नाही, मात्र आम्ही सुचवलेल्या कल्पनेवर आधारित ‘क्या बोलती पब्लिक’ हा स्लोगन वापरण्यात आल्याचा दावा मनीष ब्रह्मभट यांनी केला. आंदोलनाचे निर्णय देशभरातील स्वयंसेवक आणि रस्त्यावर उतरलेल्या तरुणांशी चर्चा करून घेतले पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे. तुम्ही तुमची टीम बनवली आणि आता म्हणतात व्हॅलेंटियरची देशात वेगळी टीम बनवू तर ते तुमचे नौकर आहेत का? ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही लोक तुमच्या म्हणण्यावर दंडे खाण्यासाठी येणार नाही. यांची स्वतःची मनमानी सुरू आहे सरकार प्रमाणेच लोकांना घाबरवणे, भीती दाखवणे आपले विचार लोकांवर लादणे हेच याचे विचार असल्याचं मनीष ब्रह्मभट यांनी म्हटलं.

दरम्यान, आंदोलनातील काही स्वयंसेवकांशी संपर्क होऊ नये म्हणून व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर काढण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. CJPची टीम निवडक व्यक्तींची असून, त्यात काही राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा दावा राहुल पांड्या यांनी केला. तसेच राहुल पांड्या यांनी पुढे म्हटलं की, सीजीपीची ही संपूर्ण टीम सिलेक्टेड आहे. नेत्यांच्या आशीर्वादाने जशी तिकीट मिळतात तसे यांचे आशीर्वाद आहे. आम्हाला आतापासूनच आंदोलन करावी लागत आहेत. मनमानी करणाऱ्यांमध्ये अभिजीत, आशुतोष अंकित आणि यांच्या गर्लफ्रेंड आहेत. यांना एकदा विचारा तुम्ही या मुलींना कशाच्या आधारावर घेतलं तुमच्या गर्लफ्रेंड्स या टीम मध्ये कसे आल्या त्याला काही मिरीट आहेत का कुठल्या आधारावर घेतल्या? असा प्रश्न उपस्थित केला आहे. “आम्ही आंदोलनाचे नुकसान होऊ देणार नाही. तरुणांना न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या आरोपांबाबत अभिजीत दिपके किंवा CJPच्या इतर पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटात दगडफेक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT