उषा नाडकर्णी या सात दशकांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात आहेत.
मराठीसोबतच त्यांनी हिंदी मनोरंजनसृष्टीतही काम केले आहे.
त्यांचे बालपण कठीण परिस्थितीत गेले
उषा नाडकर्णी यांनी अलीकडेच पतीपासून अनेक वर्षांपूर्वी विभक्त झाल्याचा खुलासा केला
१९८७ पासून एकट्या राहत आहेत
वादळवाट, मोलकरीण बाई, खुलत कळी खुलेना सारख्या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आजही आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. त्यांनी फक्त मराठीच नाही तर, बॉलीवूडमध्ये देखील आपली छाप उमटवली. पवित्र रिश्ता सारख्या हिंदी मालिकेत देखील त्यांनी काम केलं. जवळपास सात दशकांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक तसेच छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारल्या. वयाच्या ८०व्या वर्षीही त्या मुंबईतील आपल्या घरात एकट्याच राहत असून, आयुष्याचे निर्णय स्वतः घेत आहेत. याबाबद्दल त्यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
उषा नाडकर्णी यांचे बालपण मात्र अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. त्यांचे वडील हवाई दलात अधिकारी होते; मात्र त्यांचा स्वभाव अत्यंत रागीट होता. घरातील छोट्याशा चुकीवरूनही ते मुलांना आणि पत्नीला मारहाण करत. एका प्रसंगी भावाला मारहाण होत असताना उषा यांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वडिलांनी नारळ कापण्याच्या कटरने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मात्र दुसऱ्याच दिवशी त्या जखमी हाताने नाटकाच्या प्रयोगाला गेल्या.
अभिनेत्री होण्याचा निर्णयही त्यांच्यासाठी सोपा नव्हता. आईने विरोध केल्यानंतर उषा यांना काही काळ घराबाहेर राहावे लागले. तरीही त्यांनी अभिनय सोडला नाही. वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्या पतीबद्दल कधीही उघडपणे भाष्य केले नाही. अलीकडेच, त्यांनी पहिल्यांदाच खुलासा केला की त्या पतीपासून अनेक वर्षांपूर्वी विभक्त झाल्या.
उषा नाडकर्णी यांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्यांचा मुलगा त्यांच्या आईकडे आणि भावाकडे लहानाचा मोठा झाला. परिणामी तो आईशी फारसा जोडला गेला नसल्याचे उषा यांच्या भावाने सांगितलं. आता उषा यांचा मुलगा परदेशात स्थायिक आहे. याची खंत आजही त्यांच्या मनात आहे. १९८७ पासून त्या एकट्या राहत आहेत. मात्र आता एकटेपणाची किंवा मृत्यूची त्यांना भीती वाटत नाही, असे त्यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.