rajapur citizens opposed refinery project, Konkan News, Ratnagiri News saam tv
महाराष्ट्र

एकेकास पेटवून देऊ! रिफायनरी विराेधातील आंदाेलनास हिंसक वळण; प्रशासनाने दिले 'हे' आश्वासन

शासन, स्थानिक प्रशासन विश्वासात न घेता रिफायनरी संबंधित काम करत असल्याचा आराेप करीत ग्रामस्थांनी दाेन दिवस झाले आंदाेलन सुरु ठेवले आहे.

अमोल कलये

रत्नागिरी (rajapur refinery breaking news) : ग्रीन रिफायनरी (refinery project) संबंधातील बेकायदेशीर सर्वेक्षणा विरोधात पुकारलेल्या आंदाेलनास (aandolan) आज दुस-या दिवशी हिंसक वळण लागले. ग्रामस्थांनी (rajapur) रिफायनरीच्या सर्व्हेसाठी अधिका-यांनी आणलेल्या वस्तूंची जाळपोळ केली. ज्या वाहनातून हे साहित्य आणले हाेते. त्यातील काही लाकडी सामान वाहनाच्या बाहेर काढून माळरानावर पेटवून दिले. दरम्यान आंदाेलकांपैकी काही ग्रामस्थांनी ही तर सुरवात आहे. आगामी काळात एकेकास पेटवून देऊ असा इशारा दिला. (green refinery project latest marathi news)

दरम्यान रिफायनरी सर्वेक्षणाचे काम थांबवण्यात येईल असे आश्‍वासन प्रशासनाच्यावतीने आज (गुरुवार) दुपारी साडे तीन वाजता रिफायनरी विरोधी समितीस दिल्याने तब्बल 24 तासांनतर आंदोलकांनी ठिय्या आंदाेलन मागे घेतल्याचे समितीचे अध्यक्ष अमाेल बाेले यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

रिफायनरी संबंधातील बेकायदेशीर सर्वेक्षणा विरोधात ग्रामस्थांनी रात्रभर जागरण आंदोलन सुरु ठेवले. या आंदाेलनात देवाचे गोठणे , गोवळ, शिवणे सोलगाव इथले ग्रामस्थ रात्रभर माळ रानावर ठिय्या मांडून हाेते. गेली २० दिवस ड्रोन सर्व्हे , भू सर्वेक्षण बेकायदेशररित्या सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे. जोपर्यंत बेकायदेशीर सर्वेक्षण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालूच राहणार असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

आज दुपारी रिफायनरी विरोधक आक्रमक झाले. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या आधी शिवणे खुर्द गावाच्या माळरानावर सुरु असलेला सर्व्हे रिफायनरी विरोधकांनी रोखला. आपल्या हक्काच्या जमिनीत सरकारकडून अनधिकृत सर्व्हे कसा सुरु आहे असा सवाल ग्रामस्थांनी केली.

हजारो ग्रामस्थांनी माळरानावर धरणे आंदोलन सुरु ठेवले. रिफायनरीचे सुरु असलेले सर्व्हेक्षण तातडीने थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी करीत शिवणे खुर्दच्या माळरानावर सर्व्हेसाठी आलेली वाहनं ग्रामस्थांनी अडवून ठेवल्या. इथे कामासाठी आणलेल्या साहित्य ग्रामस्थांनी ताब्यात घेत काही साहित्य जाळले. जोपर्यंत प्रशासकीय अधिकारी येत नाही तोपर्यंत माळरानावर ठिय्या आंदाेलन सुरुच राहील असा पवित्रा आंदाेलकांनी घेतला. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी आंदाेलनस्थळी पाेलीसांनी चाेख बंदाेबस्त ठेवला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana ekyc : पती, वडीलांचे e-KYC बंधनकारक; लाडकींची संख्या आणखी घटणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Accident : अस्थी विसर्जन करून परतताना भरधाव कारची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Pillow Talk: पिलो टॉक म्हणजे काय? नवरा- बायकोसाठी का महत्त्वाचे आहे?

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

SCROLL FOR NEXT