लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

Local train fire : लोकलच्या डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर प्रवाशांची धावपळ उडाली.

ठाण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या एका डब्यामध्ये आग लागली. मुलुंड रेल्वे स्टेशनवर 9.32 मिनिटांनी येणाऱ्या लोकलच्या डब्यात अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अधिकाऱ्यांनी धाव घेत आग विझविली. अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये धावपळ उडाली. मात्र, तो डबा प्रवासासाठी बंद करून गाडी पुढे रवाना करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com