बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Beed shocking :बीडमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Beed news
Beed shocking Saam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमध्ये पुन्हा धक्कादायक घटना घडली आहे. बीड शहरातील व्यंकटेश लॉजमध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना 20 तारखेला उघडकीस आली आहे. तरुणाने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरुणाच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली आहे.

कृष्णा डाके (रा. नित्रुड, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी 15 तारखेला शहरातील व्यंकटेश लॉज येथे रूम क्रमांक 205 बुक केली होती. त्यानंतर कृष्णा बाहेर न आल्याने आणि रूममधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने लॉज व्यवस्थापनाने संशय व्यक्त केला. कृष्णा यांच्या रुमचा दरवाजा आतून बंद अवस्थेत असल्याचे लक्षात आले.

Beed news
Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा तेजीत; 1 तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

दरवाजा उघडून पाहणी केल्यानंतर कृष्णा डाके यांचा मृतदेह रूममध्ये आढळला. प्राथमिक अंदाजानुसार कृष्णा यांचा मृतदेह तीन ते चार दिवसांपासून खोलीतच असल्याचे सांगण्यात येतंय. कृष्णा यांच्या मृत्यूची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

Beed news
स्वामी अविमुक्तेश्वरानंद अडचणीत, आश्रमातील मुलींवरील अत्याचाराचे आरोप; कोर्टाकडून FIR नोंदवण्याचे आदेश

घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी अस्लम शेख आणि महेश चव्हाण करीत आहेत. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परंतु मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com