'ग्रीन रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांचा पाठींबा, पुढाऱ्यांच्या स्टंटबाजीस चाेख प्रत्युत्तर देऊ'

स्थानिक पोलीस व प्रशासनाने देखील या ठिकाणी होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवले पाहिजे.
green refinery project (file photo)
green refinery project (file photo)saam tv
Published On

रत्नागिरी : राजापूर (rajapur) तालुक्यात धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला केंद्र आणि राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे. तर स्थानिक जनतेने आणि जागा मालकांनीही या प्रकल्पाला पाठींबा देत आपल्या जमिनींची समंतीपत्रेही दिलेली आहेत. त्यामुळे संबधीत कंपनीकडून आता प्राथमिक स्वरूपात या प्रकल्पस्थळी माती सर्वेक्षण करणे व अन्य कामे हाती घेण्यात आली असून ती सुरळीतपणे सुरू आहेत. मात्र तरीही काही प्रकल्प विरोधाच्या नावाने आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असून अशा प्रकल्प विरोधकांच्या कोणत्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेऊ नये असे आवाहन भाजपा (bjp) जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी केले आहे. तर प्रकल्प विरोधासाठी एनजीओंच्या पुढाऱ्यांची स्टंटबाजी सुरु असून स्थानिकांच्या सहमतीने सर्वेक्षणाचे काम सुरळीतपणे सुरू असल्याचे पंढरीनाथ आंबेरकर यांनी नमूद केले. तसेच काहींनी मोजणी थांबवायचा प्रयत्न केला अशा बातम्या येत असतानाच केंद्र सरकारने पाठवलेल्या पथकाने मोजणीचे काम पूर्ण केले हे देखील समोर येणे आवश्यक असल्याचे माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी सांगितले असून मोजणी पूर्ण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (green refinery project kokan marathi news)

शांतता बिघडविण्याचा प्रयत्न सुरु

रवींद्र नागरेकर म्हणाले या प्रकल्पाला आता पाठींबा वाढत असून कंपनीकडून या परिसरात सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. याबाबत कंपनीकडून स्थानिक पातळीवर पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाला पुर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस व प्रशासनाने देखील या ठिकाणी होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवले पाहिजे. रिफायनरीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. स्थानिक जनतेचा कोणताही विरोध नाही, मात्र तरीही काही मंडळी विरोधाचा आभास निर्माण करून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे असून प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील नागरेकर यांनी केली आहे.

नौटंकी बंद करा

स्थानिक जनतेला हा प्रकल्प हवा आहे. त्यामुळे बाहेरून येंऊन या प्रकल्पाला विरोध आहे असे सांगून जनतेची दिशाभुल करणाऱ्या एनजीओ आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी आता आपली नौटंकी बंद करावी अन्यथा जशास तसे उत्तर द्यावे लागेल असा इशारा नागरेकर यांनी दिला आहे.

green refinery project (file photo)
बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?; जाणून घ्या स्टेप्स

स्टंटबाजी स्थानिक जनता खपवून घेणार नाही

राजापूर तालुक्यात धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेने पाठींबा दिलेला आहे. तर अनेक जागा मालकांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी घ्याव्यात अशी लेखी संमती पत्रे दिलेली आहेत. अशा जमिन मालकांच्या जागेत त्यांच्या समंतीने सुरू असलेल्या या राष्ट्रीय प्रकल्पाच्या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध करण्याचा प्रयत्न काही दोन चार एनजीओंचे पुढारी करत असून त्यांची ही प्रकल्प विरोधाची स्टंटबाजी स्थानिक जनता खपवून घेणार नाही असा इशारा कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी दिला आहे.

या प्रकल्पाला मोठया प्रमाणावर स्थानिकांचे समर्थन असून स्थानिकांच्या सहमतीनेच या परिसरात प्रकल्पाबाबत प्राथमिक माती परिक्षण व अन्य कामे सुरू करण्यात आलेली असल्याचे आंबेरकर यांनी सांगितले.

green refinery project (file photo)
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पदार्पणातच द्विशतक ठाेकणारा सुवेद पारकर ठरला मुंबईचा दुसरा फलंदाज

या प्रकल्पाचे धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरातील स्थानिक शेतकरी व जमिन मालकांनी स्वागत केले आहे. या प्रकल्पासाठी अनेकांनी आपल्या जमिनी देऊ केल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिकांचा पाठींबा हा दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिकांच्या वाढत्या पाठींब्यानंतरच कंपनीकडून या परिसरात प्राथमिक माहिती गोळा करणे, माती परिक्षण करणे व सर्वेक्षण करण्याची कामे हाती घेण्यात आली आहे.

गोवळ गावातील शेतकरी गौरव परांजपे यांच्या मालकीच्या जागेत अशा प्रकारे ड्रोन कॅमेराद्वारे सर्वेक्षण सुरू असताना एनजीओंच्या एक दोन पुढाऱ्यांनी येऊन तेथे काम थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांचा कुणाचाही या कामाला विरोध नाही. खुद्द जागा मालकांच्या संमतीने हे काम सुरू असल्याने या पुढाऱ्यांना अशा प्रकारे या राष्ट्रीय प्रकल्पाचे सर्वेक्षणाचे काम रोखण्याचा अधिकार काय असा सवाल आंबेरकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या अशा स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात आंम्ही कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबीणार असल्याचे आंबेरकर यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

green refinery project (file photo)
CWG: संघातून वगळल्याने न्यायालयात धाव घेतलेली दिया चितळे करणार देशाचे प्रतिनिधित्व

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com