aurangabad, aurangabad police, santosh wagh
aurangabad, aurangabad police, santosh wagh saam tv
महाराष्ट्र

मित्राच्या मदतीनं पाेलिसानं लुटल्याची सराफाची तक्रार; गुन्हा दाखल

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

Aurangabad Crime News : औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडवून देणारी धक्कादायक घटना जिल्ह्यात समोर आली आहे. चक्क एका पोलीस (police) कर्मचाऱ्याने सराफ व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद शहर (city) हद्दीतील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष वाघ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो औरंगाबाद ग्रामीण पोलिसात सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. संतोष वाघ याने आपला मित्र रामचंद्र दहिवाळ याच्यासह सराफ व्यापाऱ्याला केंब्रिज चौकात अडवून पोलीस असल्याचा सांगत चौकशी करण्याच्या बहाण्याने अडवून तब्बल 26 तोळे सोनं आणि साडेआठ लाख रुपये कॅश सराफ व्यापाऱ्याकडून लुटली अशी तक्रार करण्यात आली हाेती.

अशोक विसपुते असे सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. सराफ व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दिली. अखेर पोलिसांनी संतोष वाघच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : चीनमध्ये महामार्ग खचून १९ जणांचा मृत्यू, २० वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली

Stale Food Disadvantages : शिळं जेवण खाल्ल्याने तुम्हाला होतील 'हे' गंभीर आजार

उत्तम अभिनेत्री, निवेदिका, कवियित्री आहे Prajakta Mali

Heart Attack: 'या' पदार्थांचा आहारात समावेश केल्यास टळेल हृदय विकाराचा धोका

Home Remedies: सतत चष्मा वापरल्याने नाकावर डाग पडलेत? ट्राय करा सोपे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT