ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हृदय ब्लॉकेज हा एक गंभीर आजार आहे. तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.
शरीराची काळजी घेण्यासाठी आहारामध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडेंट्स या घटकांचा समावेश केला पाहिजे.
तीळामध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात आढळते ज्यामुळे शरीराताल रक्तदाब संतुलित करण्यास मदत होते.
सुर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई असते ज्यामुळे हृदयासंबंधीत समस्या दूर होतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्निशियम, झिंक, अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहाते.
आळीवच्या बियांमध्ये अल्फा लिनोलेनिक अॅसिड असते ज्यामुळे हृदय रोगापासून संरक्षण करते.
चिया बियांमध्ये ओमेगा ३, फायबर, अँटिऑक्सिडेंट्स असते ज्यामुळे हृदय निरोगी राहाण्यास मदत होत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़