Aurangabad : औरंगाबादकरांनाे ! रिक्षा प्रवास महागला, जाणून घ्या दर

प्रवासी भाडे नाकारता येणार नाही.
auto rickshaw, aurangabad, auto fare
auto rickshaw, aurangabad, auto faresaam tv

- नवनीत तपाडिया

Aurangabad Auto Rickshaw Fare : औरंगाबाद शहरातील रिक्षा चालक संघटनेच्या दरवाढीच्या मागणीस जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे येत्या दाेन ऑक्टोबरपासून औरंगाबाद शहरात रिक्षातून (rickshaw) प्रवास करण्यासाठी नागरिकांना जादा पैसे माेजावे लागणार आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून रिक्षाचालक संघटनेकडून भाडेवाढ करण्याची मागणी सुरू हाेती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ही मागणी मान्य करत रिक्षाचे भाडे दीड किलोमीटरला २६ रुपये तर पुढे प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली. ही दरवाढ २ ऑक्टाेबरपासून लागू हाेईल.

जिल्हाधिकारी म्हणाले मार्च २०२० मध्ये खटुआ समितीच्या शिफारशीनुसार शासनाकडे प्रस्ताव दिला होता. यानुसार रिक्षाला पहिल्या टप्प्यात दीड किलोमीटरला २६ रुपये तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला १८ रुपये अशी सुधारणा करण्यात आली. आता रिक्षाचालकांना कॅलिब्रेटर मीटर बसवावे लागतील. तोपर्यंत त्यांना ट्रॅफिक कार्ड दिले जातील. यासोबतच रिक्षाचालकांना गणवेश घालणे अनिवार्य असेल. पार्किंग नसलेल्या ठिकाणी रिक्षा पार्क करता येणार नाही. प्रवासी (passengers) भाडे नाकारता येणार नाही. तसेच २ ऑक्टोबरपासून ६० दिवसांच्या आत नवे मीटर बसवावे लागतील. त्यासाठी ९ ठिकाणी सेंटर उघडले जाईल.

Edited By : Siddharth Latkar

auto rickshaw, aurangabad, auto fare
VITTHAL RUKMINI MANDIR : पस्तीस वर्ष वारक-यांचा भार झेलणारा सात मजली दर्शन मंडप हाेणार जमीनदाेस्त (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com