chitra wagh Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत वाद उफाळणार; चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

Maharashtra Political News : चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्या मंगळवेढ्यात बोलत होत्या.

Vishal Gangurde

नगर परिषदेची निवडणुकीत प्रचाराचा धडाका

चित्रा वाघ यांची मंगळवेढ्यात प्रचारसभा

चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाची शक्यता

राज्य आयोगाकडून २९ महापालिका निवडणुकींची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या टप्प्याच्या नगर परिषदेची निवडणूकही सुरू आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षातील नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावलाय. पंढरपूरच्या मंगळवेढ्यातही निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवेढा नगर परिषदेतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी आज हजेरी दर्शवली. याच निवडणुकीतील प्रचारसभेतील चित्रा वाघ यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पंढरपुरातील मंगळवेढा नगरपरिषदेची निवडणूक सुरू आहे. यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. भाजप आमदार चित्रा वाघ या देखील विविध ठिकाणी प्रचारासाठी फिरताना दिसत आहेत. चित्रा वाघ यांनी आज मंगळवेढ्याला भाजप उमेदवार सुप्रिया जगताप यांच्या निवडणूक प्रचाराला हजेरी लावली. या प्रचारार्थ महिला मेळाव्यात चित्रा वाघ यांनी उपस्थितांना संबोधित करताना वादग्रस्त वक्तव्य केलं.

चित्रा वाघ यांचं वादग्रस्त वक्तव्य

मंगळवेढ्यातील प्रचारसभेतील चित्रा वाघ यांच्या वादग्रस्त वक्तव्याने ऐन निवडणुकीत नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. खा कुणाचंही मटण, पण कमळाचं दाबा बटण, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं. तसेच या मेळाव्यात आमदार चित्रा वाघ यांनी 'जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा' या गाण्यावरही ठेका धरला. यावेळी इतर महिला पदाधिकाऱ्यांनीही या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळालं.

तत्पूर्वी, लोकप्रतिनिधी असलेल्या चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्याने विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. विरोधकांकडून कारवाईची मागणी होत आहे. विरोधकांच्या मागणीनंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT