Tragic Scene in Chiplun: Speeding Thar collides with rickshaw, 5 killed instantly. 
महाराष्ट्र

Ratnagiri : चिपळूणमध्ये भयंकर अपघात, पावसात थारने रिक्षाला उडवले, ५ जणांचा जागीच मृत्यू

accident in Chiplun : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळील पिंपळी येथे अपघात झाला. धडकेनंतर रिक्षा चक्काचूर झाला, महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आणि जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Namdeo Kumbhar

  • चिपळूणजवळ पिंपळी येथे थार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला.

  • अपघातात रिक्षातील चौघे प्रवासी व थार चालक असे ५ जण ठार झाले.

  • मृतांमध्ये अडीच वर्षांचा चिमुरडाही सामील होता.

  • पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले आणि तपास सुरू केला आहे.

Chiplun Accident News : धो धो कोसळणाऱ्या पावसामध्ये रत्नागिरीमधील चिपळूण जवळ भयंकर अपघात झाला आहे. भरधाव असणाऱ्या थार कारने रिक्षाला चोरात उडवले. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी चिपळूण कराड मार्गावर पिंपळीमध्ये रात्री हा भीषण अपघात जाला आहे. मृतांमध्ये अडीच वर्षीय चिमुरड्याचाही समावेश आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

चिपळूणजवळील पिंपळी येथे भरधाव थार जीप आणि प्रवासी रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पिंपळी नुराणी मोहल्ला येथील चौघांचा समावेश असून थार चालकाचाही त्यात मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. थार गाडी वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षातील चौघे प्रवासी जागीच ठार झाले, तर थारचा चालकही मृत्यूमुखी पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, थार गाडीचा चालक हा मूळचा हरियाणामधील आहे. तो मुलाला घेऊन सुसाट निघाला होता. थार गाडीने समोरून आलेल्या प्रवासी रिक्षाला जोरात धडक दिली, त्यानंतर ट्रकवर जाऊन आदळला. या अपघातात रिक्षा आणि थार गाडीचा चक्काचूर झाला. थारमधील मुलगी मला वाचवा, मला वाचवा असे ओरडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुदैवाने या दुर्घटनेत ती मुलगी सुखरुप बचावली.

भयंकर अपघातामध्ये रिक्षामधील शबाना मियां सय्यद, हैदर नियाज सय्यद, नियाज हुसेन सय्यद, रिक्षा चालक इब्राहिम इस्माईल लोणी या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर थारचा चालकाचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये रिक्षातील आई-वडील व मुलगा या तिघांचाही मृत्यू झाला आहे. थार चालकाचे नाव अद्याप समजू शकले नाहीत, पोलिसांकडून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. चिपळूण पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का; रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या नेत्याने घेतली मशाल हाती

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्याल?

Maharashtra Live News Update : मंत्री उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा

Soft ParathaTips: पराठे लाटताना फाटतात? नीट शेकत नाहीत? मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shraddha Kapoor Injured: शूटिंगदरम्यान मोठा अपघात; अभिनेत्रीचा मोठा अपघात नाचता नाचता अभिनेत्रीचा पाय मोडला

SCROLL FOR NEXT