child kidnapping rumors viral in Nashik
child kidnapping rumors viral in Nashik तबरेज शेख
महाराष्ट्र

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेने गेल्या दोन दिवसात मारहाणीची तिसरी घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख, नाशिक

नाशिक: गेल्या काही दिवसापासून मुले पळवणारी टोळी फिरत असल्याची अफवा (Rumor) पसरली आहे. ग्रामीण भागात अशा अफवा मोठ्या प्रमाणावर पसरल्याने नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवून त्याला खतपाणी घातले जात असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका एका महिलेला बसला आहे. मुलं पळविणारी समजून स्थानिक नागरिकांनी एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांत अशी तिसरी घटना नाशिकमध्ये घडली आहे. (Nashik Crime News)

नाशिक शहराच्या सिडको भागात पुन्हा एकदा महिलेला मुलं पळवणारी समजून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा मेसेज प्रचंड व्हायरल झाला असून नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे. तर कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे.

कोणीतरी सोशल मीडियाचा गैर फायदा घेत शहरात मुलं पळवणारी टोळी सक्रिय आहे, सतर्क राहावे असा महाराष्ट्र पोलिसांच्या नावानेच मेसेज व्हायरल केला. पाहता-पाहता हा मेसेज नाशिममध्ये इतका व्हायरल झाला की, नागरिक हे मोठ्या भीतीच्या आणि परिसरात येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीकडे किरकोळ विक्रेत्यांकडे संशयाच्याच नजरेने पाहात आहेत. अनेक ठिकाणी काही जणांना नागरिकांनी मुलं पळवणारे समजून मारहाणदेखील केली आहे. काल रात्रीच्या सुमारास सिडको परिसरातील राणाप्रताप चौकातून जात असलेली एक महिला ही मुलं पळवणारी आहे, असा गैरसमज नागरिकांना झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता-पाहता मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमली.

पाहा व्हिडिओ -

नागरिकांनी या महिलेला पकडून तिला कानशिलात लगावत तिला मारहाण केली. त्यातल्या त्यात सर्वात मोठी गोष्ट अशी की, येथील एक जण तर चक्क घरी विडिओ कॉल करुन पकडलेल्या महिलेला दाखवण्यासाठी कसरत करत असल्याचे दिसून आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून वारंवार नागरिकांना अश्या प्रकारची कुठलीही टोळी सक्रिय नसल्याचे आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले जात आहे

एकूणच सोशल मीडियावर रंगवून व्हायरल केलेल्या मेसेजमुळे भयभीत झलेल्या नागरिकांकडून मात्र सगळेच अनोळखी हे संशयाच्या नजरेतच आहेत. याआधी देखील टाकळी येथे ब्लॅंकेट विक्रेत्यांना, गंजमाळ येथे दोघाजणांना तर काल, वडाळा गाव येथे प्रेयसीला बुरखा घालून भेटायला गेलेल्या युवकाला मुलं पळवणाऱ्या टोळीचे सदस्य समजून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता.

या घटनांमुळे आता सोशल मीडियाचा गैर फायदा घेऊन नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू केले आहे. यात काल, शनिवारी एका बुरखाधारी तरुणाला मारहाण करणार्‍यांवर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच खोटे मेसेज पाठवणाऱ्यांवर कारवाई करणार आणि त्या व्हॉट्सअॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर देखील कारवाई होणार आहे. नागरिकांचा गैरसमज आणि भीती काढणे गरजेचे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून नये, तसेच कुठलाही गैरप्रकार लक्षात आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Jaljeera: रोज एक ग्लास जलजीरा पिण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Weightloss Recipe: डायटींग करताना सोपी आणि हेल्दी चाट रेसिपी करा ट्राय

Today's Marathi News Live : ​हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्वपदावर

CM Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची आधीच विकेट गेलीय; संजय निरुपम यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Cancer Health Tips: कर्करोग टाळाण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' छोटे बदल

SCROLL FOR NEXT