Buldhana: मलकापुरातील बेंजो केमिकल कंपनीला तब्बल २५ कोटींचा दंड; राष्ट्रीय हरित लवादाचा दणका

25 crore penalty to Benzo Chemical Industries: हा दंड तीन महिन्यांच्या आत जमा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
Benzo Chem Industries Pvt. Ltd.
Benzo Chem Industries Pvt. Ltd.संजय जाधव
Published On

बुलढाणा: मलकापूर येथील बेंजो कॅमिकल कंपनीने गत दहा वर्षांपासून रसायनयुक्त सांडपाणी खुल्या जागेत सोडल्याने तसेच दूषित पाणी पावसाच्या पाण्यात मिसळल्याने ५० शेतकऱ्यांची २५० एकर जमीन नापीक झाली. याप्रकरणी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (National Green Tribunal) दाखल केलेल्या प्रकरणात कंपनीच्या परवान्यातील अटी व शर्ती, तसेच पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला २५ कोटी रुपये दंड (Penalty) राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. तसेच हा दंड तीन महिन्यांच्या आत जमा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. (Buldhana Latest News)

Benzo Chem Industries Pvt. Ltd.
गॅस कटरने ATM मशीन फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास, पोलिसांनी केली चोरट्यांच्या टोळीला अटक

मलकापूर (Malkapur) तालुक्यातील दसरखेड एमआयडीसीमध्ये २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या बेंजो कॅमिकल कंपनीच्या (Benzo Chem Industries Pvt. Ltd.) दूषित पाण्यामुळे शेतजमिनीसह पाणी स्रोतांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ अकोला यांच्याकडे तक्रारी केल्या, मात्र कारवाई झाली नाही.

कंपनीतून वाहणारे विषारी पाणी वाघोळा, म्हैसवाडी, रणथम, दसरखेड या परिसरातील विहिरींमध्येही मिसळत होते. त्यामुळे दसरखेड येथील अरविंद महाजन, निना धारकर, गोविंदराव डोसे, विनोद एकडे, उमेश नारखेडे आणि इतर ४५ शेतकऱ्यांनी पुणे येथील हरित लवाद न्यायालयात प्रकरण अँड. साहेबराव मोरे यांच्यामार्फत दाखल केले होते. याचिकाकर्त्याची बाजू एड. बिना परदेशी यांनी मांडली. लवादाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेत २९ ऑगस्ट रोजी निर्णय दिला.

Benzo Chem Industries Pvt. Ltd.
Mumbai Crime: बोलबच्चन गॅंगच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; बोलण्यात अडकवून करायचे चोरी

यात पर्यावरणासह शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत बेंजो कंपनीला जबाबदार धरत २५ कोटी रुपये दंड बेंजो कंपनीला ठोठावण्यात आला आहे. तसेच भविष्यात कंपनीकडून अशा प्रकारचे उल्लंघन आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गंभीर कायदेशीर कारवाई केली जाईल, असाही आदेश हरित लवादानं दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com