CM Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची आधीच विकेट गेलीय; संजय निरुपम यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
CM Shinde file Pic Saam Tv

CM Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची आधीच विकेट गेलीय; संजय निरुपम यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Chief Minister Eknath Shinde : संजय निरुपम आणि मुंबईतील शिवसेनेच्या उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना टोला मारलाय.

Eknath Shinde Slams On Uddhav Thackeray : मुंबई: मुंबईत कोणाचीच विकेट काढायची गरज नाहीये. उद्धव ठाकरे यांची आधीच विकेट गेलीय. ते आधीच क्लीन बोल्ड झालेत. महायुती मुंबईतील ६ च्या ६ जागा जिंकत विजयाचा षटकार मारणार, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला मारलाय. मुंबईतील शिवसेनेच्या तिन्ही जागांवरील उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

उमेदवारी निश्चित झाल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार कसा केला जाणार याची रणनीती ठरवण्यासाठी आज बैठक झाल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. राहुल शेवाळे, रविंद्र वायकर,यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उमेदवारांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई,उत्तर पश्चिम मुंबई या ३ जागा शिंदे गटाच्या शिवसेनेकडे आल्या आहेत. या तिन्ही जागांवर प्रचार कसा करायचा याची रणनीती आज बैठकीत ठरवण्यात आल्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. शिवेसनेच्या तिन्ही जागांवर मोर्चेबांधणी झालीय.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आधीच काम सुरू केलंय. यामुळे या तिन्ही जागा शिवसेनेच्या चिन्हावर लढवण्यात येणाऱ्या महायुतीच्या ३ जागा जिंकू. तसेच भाजपच्याही तीन जागांवर विजय होईल.म्हणजेच महायुतीच्या ६ जागांवर विजय जिंकत विजय षटकार लावू, सर्वत्र विजयाचा वातावरण असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवलाय. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंवर प्रश्न केला.

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची विकेट काढणार का? असा सवाल केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला मारला. उद्धव ठाकरेंची आधीच विकेट गेलीय. ते क्लीन बोल्ड झालेत. मतदारांनी ठरवलाय आम्ही काम करणारे राजकारणी आहोत. यामुळे लोकांनी ठरवलंय जे काम करतात, मुंबईचा विकास करतात त्यांना निवडून द्यायचं. मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालोय, तसे विकासकामे चालू आहेत. जे कामे १५-२० वर्षात झाली पाहिजे होती ते कामे झाली नाहीत. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून ते सर्व कामे पूर्ण केली आहेत.

CM Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची आधीच विकेट गेलीय; संजय निरुपम यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
Kalyan, Thane Lok Sabha: उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदे- नरेश म्हस्के शिवतीर्थवर, राज ठाकरेंचा घेतला आशीर्वाद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com