आता एक महत्त्वाची बातमी चिकन खाणाऱ्यांसाठी आहे. पुन्हा एकदा बर्ड फ्लूने आपल्या राज्यामध्ये शिरकाव केला आहे. बर्ड फ्लूच्या काळात कोंबडीचं मांस खाल्ल्याने मानवांमध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे घरात चिकन शिजवताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. आता चिकन खाताना नेमकं कोणती काळजी घ्यावी याच संदर्भातला आमचा एक खास रिपोर्ट आपण पाहणार आहोत...
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर गावात अचानक १२३७ कोंबड्या दगावल्या. एवढ्या कोंबड्यांच्या मृत्यू झाल्याने प्रशासन अलर्टवर मोडवर आलं आणि सर्व कोंबड्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या कोंबड्या बर्ड फ्लूमुळेच दगावल्याचं स्पष्ट झाल्यानंतर चिरनेर गावातील जवळपास दीड हजार कोंबड्या नष्ट करून परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे. बर्ड फ्लूचं संक्रमण आटोक्यात येईपर्यंत गावातून कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदीही घालण्यात आली आहे.
70 डिग्री सेल्सियस किंवा त्याच्यापेक्षा जास्त आचेवर शिजवलेले चिकन खावे
संसर्ग झालेल्या भागातील पक्ष्यांचा संपर्क टाळावा
कच्चे चिकन उघड्यावर ठेवू नये
कच्चे चिकन हाताळताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करावा
दुसरीकडे लातूरच्या उदगीरमध्ये देखील बर्ड फ्लूने धुमाकूळ घातलाय. बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे उदगीरमधील अनेक कावळ्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तातडीने प्रतिकात्मक उपाय योजना सुरू करण्यात आलेत. ज्या ठिकाणी कावळ्यांच्या मृत्यू झालाय त्या परिसरात १० किलोमीटरपर्यंत अलर्ट झोन करण्यात येत आहे. बर्ड फ्लूची लागण झालेलं चिकन खाल्ल्यामुळे नागपूरमधील गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील तीन वाघ, एका बिबट्याचा याआधी मृत्यू झाला आहे.
चिकन खाणाऱ्यांनी आणि चिकनचा व्यवसाय करणाऱ्यांनी योग्य काळजी घेतली तर भविष्यात होणारा धोका टळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणं आणि सावधगिरी बाळगणं गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.