Bird Flu : लातूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव; उदगीर शहरात ५० कावळ्यांचा मृत्यू

Latur News : पक्षांमध्ये प्रामुख्याने बर्ड फ्लूचा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील काही वर्षांपूर्वी कोंबड्यांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात झाल्याने यात हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला होता
Bird Flu
Bird FluSaam tv
Published On

संदीप भोसले 

लातूर : पक्षांमध्ये उद्भवणारा बर्ड फ्लू आज डोके वर काढले आहे. यात लातूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील उदगीर शहरात ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत कावळ्यांची तपासणी केली असता बर्ड फ्लूने मृयू झाल्याचे समोर आले आहे. सदरची बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून तातडीने प्रतिकात्मक उपाय योजना राबवण्याच आव्हान आहे. 

पक्षांमध्ये प्रामुख्याने बर्ड फ्लूचा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील काही वर्षांपूर्वी कोंबड्यांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात झाल्याने यात हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता लातूरमध्ये पुन्हा बर्ड फ्लूने डोके वर काढल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा प्रशासनाकडून तातडीने उपास योजना करण्यास सुरवात करण्यात आली आहे. 

Bird Flu
Success Story: अवघ्या २२ व्या वर्षी केली UPSC क्रॅक; IAS स्वाती मीणा आहेत तरी कोण?

मागच्या चार दिवसांपासून उदगीर शहरात अनेक ठिकाणी कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. अचानक जवळपास ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या कावळ्यांच्या मृत्यू बाबत अहवाल मागवण्यासाठी नमुने भोपाळ येथील वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. मात्र आता हे प्रयोगशाळेतील नमुने प्राप्त झाले आहेत. यात या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतीकात्मक उपाय योजना सुरू केल्या. 

Bird Flu
Hingoli News : पिसाळलेलं कुत्रं विहिरीत पडलं, अख्ख गाव रुग्णालयात धावलं; हिंगोलीतील प्रकारने सर्वच चक्रावले

दहा किलोमीटर क्षेत्रात अलर्ट झोन 

कावळ्याचा मृत्यू झालेल्या परिसरात दहा किलोमीटर परिसर अलर्ट झोन करण्यात आला. बाधित क्षेत्रात नागरिकांच्या हालचाली पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे. बाधित क्षेत्रात कुक्कुट पक्षांचे सर्वेक्षण आणि वैद्यकीय नमुने संकलित केले जाणार आहेत. नागरिकांनी कसलीही भीती बाळगू नये; अस आव्हान देखील पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com