Nagpur Bird Flu: सावधान! नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेक; शेकडो कोंबड्यांचा मृत्यू

Nagpur Bird Flu News: नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेक झाला आहे. नागपुरात बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्याच्या मृत्यू झाला आहे. यानंतर शासनाने मोठी खबरदारी घेतली आहे.
Nagpur Bird Flu: Bird Flu Outbreak in Nagpur; Hundreds of Chickens Died Due to Bird Flu
Nagpur Bird Flu: Bird Flu Outbreak in Nagpur; Hundreds of Chickens Died Due to Bird FluSaam tv

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur Bird Flu Update :

नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेक झाला आहे. नागपुरात बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्याच्या मृत्यू झाला आहे. यानंतर शासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. शहरातील बर्ड फ्लूमुळे पशू संवर्धन विभाग अलर्ट मोडवर आलं आहे. (Latest Marathi News)

नागपुरात बर्ड फ्लूचा संक्रमण झाल्याचे समोर आलं आहे. राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्येच बर्ड फ्लूचा उद्रेक झाला. रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे, याचे कारण तपासण्यासाठी नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यानंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले.

Nagpur Bird Flu: Bird Flu Outbreak in Nagpur; Hundreds of Chickens Died Due to Bird Flu
MP Plane Crash: मध्य प्रदेशात विमान कोसळले, गुना विमानतळावर उतरताना अपघात; VIDEO आला समोर

या प्रयोगशाळेचा चार मार्च रोजी आलेल्या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजे एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे रिपोर्टमध्ये सिद्ध झाले. त्यानंतर नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आलं. तर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं.

कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण लागल्याचे सिद्ध झाल्यानंतर पाच मार्चच्या रात्री संबंधित पोल्ट्री फार्ममधील 8501 कोंबड्या मारण्याची प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेला कलिंग असंही म्हटलं जातं. तसेच फॉर्ममधील 16 हजार पेक्षा जास्त अंडीही नष्ट करण्यात आली आहे.

Nagpur Bird Flu: Bird Flu Outbreak in Nagpur; Hundreds of Chickens Died Due to Bird Flu
Beed News: बीडमधील अख्ख्या गावाचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; ग्रामपंचायतीतच ठराव, कारण वेगळंच!

नागपूरच्या जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक यांनी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रमधील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचे मान्य केले. तसेच नागरिकांनी घाबरून जाण्याचा कारण नाही. तसेच शासनाने संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूमुळे नियमांचे पालन करत कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा केला आहे.

नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याने इतर पोल्ट्री फार्म मालकांमध्ये चिंता वाढली आहे. तर बर्ड फ्लूमुळे मालकांना आर्थिक नुकसानीची भीती वाटू लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com