मध्य प्रदेशातून एक मोठी बातमी येत आहे. येथे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. गुना विमानतळावर विमान क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानाने नीमचहून सागरकडे उड्डाण केले होते. यानंतर विमानाच्या महिला पायलटने गुना येथे आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती.
लँडिंग दरम्यान विमानाचा अचानक तोल गेला. त्यानंतर विमान कोसळले. या विमान अपघातात महिला पायलट नॅन्सी मिश्रा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीच्या पलीकडे जाऊन गोपालपुराच्या दिशेने गेलं, असं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता. त्यानंतर महिला पायलटने गुना एरोड्रोमवर विमान उतरवण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान, धावपट्टीवर उतरत असताना विमान तलावाच्या काठावरील झुडपात पडले. ही माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. जखमी पायलटला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये अपघातग्रस्त विमाना दिसत आहे. विमानाचा ढिगारा सर्वत्र विखुरलेला दिसत आहे. घटनास्थळी पोलिसांचा ताफाही दिसत आहे. सध्या या विमान अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.
पोलीस उपनिरीक्षक चंचल तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''हे विमान नीमच येथून उड्डाण करून सागर ढानाकडे जात होते. पण विमानात बिघाड झाला. त्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. इमर्जन्सी लँडिंगवेळी विमान नियंत्रणात आले नाही आणि अपघात झाला. या अपघातात ट्रेनी पायलट जखमी झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.