Wardha News Saam Digital
महाराष्ट्र

Wardha News : मजुरांना गावी जायचं होतं..७ दिवसातच सेंट्रींग काढलं अन् अनर्थ झाला; स्लॅब कोसळून २ मजुरांचा मृत्यू

Sandeep Gawade

चेतन व्यास

Wardha News

सात दिवसांपूर्वी शेतात ये-जा करण्यासाठी नाल्यावर मजुरांनी स्लॅब टाकला होता. या स्लॅबचे सेंट्रींग काढत असतानाच स्लॅब कोसळल्याने स्लॅबखाली दबून दोन छत्तीसगडी मजुरांचा मृत्यू झाला. आर्वी तालुक्याच्या वाढोणा गावातील स्मशानभूमी जवळ ही दुर्घटना घडली असून अशोक वरकडे (३५), नवल टेकाम (३२) अशी मृतकांची नावे आहेत.

सात दिवसांपूर्वी स्मशानभूमी जवळील नाल्यावर नागरिकांनी कंत्राटदाराकडे नाल्यावर पूल टाकण्यासाठी मागणी केली होती. कंत्राटदार प्रफुल रामटेके याने मजुरांना नाल्यावर स्लॅब टाकण्यास सांगितलं. त्यानुसार सेंट्रींग टाकून स्लॅब टाकण्यात आला. स्लॅबवरील सेंट्रींग किमान २१ दिवस ठेवणे आवश्यक होत, माकत्र मजुरांना छत्तीसगडला आपल्या गावी जायचं होतं. त्यामुळे त्यांनी घाई करत अवघ्या सात दिवसांतच स्लॅबचं सेंट्रींग काढण्यासाठी घेतलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान स्लॅबचं सेंट्रींग काढणं सुरू असतानाच स्लॅब कोसळला. या स्लॅबखाली दबून दोन्ही मजुरांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मजुरांना बाहेर काढलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Effect On Health: आहारात मीठाचं सेवन जास्त प्रमाणात करताय? आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम

Indian Port Workers Salary : बंदर आणि गोदी कामगारांना घसघशीत पगारवाढ; पगार किती टक्क्यांनी वाढणार? वाचा

Bribe Case : शाळेतील शिपायाकडून १० हजाराची मागणी; मुख्याध्यापक एसीबीच्या ताब्यात

Hasan Mushrif : 'मी पवारांना गुरुदक्षिणा दिली, पण ..' ; हसन मुश्रीफांचं मोठं विधान

IPL 2025: राजस्थान रॉयल्स संघ या ४ खेळाडूंना करू शकतो रिटेन

SCROLL FOR NEXT