राज्यभरातील निवासी डॉक्टर वेतनात वाढ आणि वस्तीगृहाची दुरुस्ती यासह विविध मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने संपावर गेले आहेत. राज्यातील निवासी डॉक्टरांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. राज्यभरातील डॉक्टरांनी निवासी डॉक्टरांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. या संपातील सहभागी असलेल्या डॉक्टरांनी भरसभेत रोहित पवारांना फोन केला. त्यानंतर रोहित पवारांनी भरसभेत या डॉक्टरांना प्रतिसाद दिला. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
निवासी डॉक्टरांनी गेल्या महिन्यात ७ फेब्रुवारीला संपाची हाक दिली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मध्यस्थी करत मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, अजित पवारांकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही.त्यामुळे निवासी डॉक्टरांनी आजपासून पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संपाची घोषणा केल्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निवासी डॉक्टरांनी संपादरम्यान अहमदनगरच्या दौऱ्यावर असलेल्या रोहित पवारांना भरसभेत फोन केला. रोहित पवारांनीही निवासी डॉक्टरांच्या फोनला प्रतिसाद दिला.
अहमदनगरमधील एका सभेत असलेल्या रोहित पवारांना संपावर असलेल्या डॉक्टरांनी फोन केला. येत्या कॅबिनटमध्ये प्रश्न सुटला नाही तर मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा शब्द रोहित पवार यांनी यावेळी दिला. राज्यभरातील ९००० निवासी डॉक्टर संपावर आहेत. त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारने विद्यावेतन वाढवला नाही, अशी तक्रार संपकरी डॉक्टरांनी रोहित पवार यांच्याशी फोनवरून केली.
तेव्हा रोहित पवार यांनी येत्या कॅबिनेटमध्ये जर प्रश्न निकाली नाही निघाला तर आपणही मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलनाला बसू असा शब्द संपकरी डॉक्टरांना दिला. तसेच आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण तुम्ही गरीब रुग्णांचा विचार करा. मी तुमच्यासोबत मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करायला तयार आहे, असेही रोहित पवारांनी निवासी डॉक्टरांना कळविले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.