MVA Seat Allocation: मविआत जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत; तुतारी, मशालवरून नाना पटोले नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या

Maharashtra Politics News | MVA Seat Allocation: जागावाटपावरून महाविकास आघाडीत कसलेही मतभेद वा गोंधळ नाहीत, गोंधळ हा महायुतीत आहे, असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
MVA Seat Allocation
MVA Seat Allocation Saam Digital
Published On

Maha Vikas Aghadi Seat Allocation News

जागावाटपावरून महाविकास आघाडीत कसलेही मतभेद वा गोंधळ नाहीत, गोंधळ हा महायुतीत आहे. त्यांच्यात काहीच ताळमेळ नाही. मविआतील सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरू असून बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत, लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. भाजपाला सत्तेतून हद्दपार ठेवणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे आणि आम्ही महायुतीचा मोठा पराभव करू, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

महायुतीचे वातावरण राज्यात कुठेच नाही ते फक्त जाहिरातीतच दिसत आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू आहे परंतु जनभावना मात्र वेगळी आहे. निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बारामतीच्या जागेवरही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येणार असल्याचं ते म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपा व त्यांचे मित्रपक्ष मीडियातून वातावरण निर्मिती करत आहेत प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. अजित पवार यांनी बारामतीत बिर्याणीचा कार्यक्रम ठेवला होता, परंतु ते शरद पवारांविरोधात बोलायला लागले आणि लोक निघून गेले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. एका हातात मशाल व दुसऱ्या हातात तुतारी हा भाजपाच्या तानाशाहीला संदेश आहे. या तुतारीत अत्याचारी व्यवस्थेला संपवण्याची क्षमता आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म दिला परंतु या अत्याचारी व्यवस्थेने त्यांचा पक्ष व घड्याळ चिन्हही चोरून घेतलं, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

MVA Seat Allocation
Stray Dog Age : कुत्र्यांचं आयुष्य ४ वर्षांनी घटलं; माणसाशी आहे थेट संबंध? काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

काँग्रेसमधून काही लोक बाहेर जात आहेत या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, सत्तेच्या जोरावर त्यांना जेवढे घ्यायचे आहेत तेवढे घेऊ द्या, त्यांच्या पक्षातील कितीजण आमच्या संपर्कात आहेत याची त्यांना कल्पना नाही. सत्तेच्या जोरावर जेवढा खेळ खेळायचा तेवढा त्यांना खेळू द्या, आम्ही एकच हातोडा मारू मग त्यांना कळेल, असंही नाना पटोले म्हणाले.

MVA Seat Allocation
Beed Electric Bus : बीडकरांचा प्रवास होणार स्वस्तात, एप्रिलपर्यंत ईव्ही बस हाेणार दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com