Beed Electric Bus : बीडकरांचा प्रवास होणार स्वस्तात, एप्रिलपर्यंत ईव्ही बस हाेणार दाखल

बीड जिल्ह्यातील माजलगाव आगारामध्ये सर्वात अगोदर पर्यावरणपूरक बस सुविधा उपलब्ध होणार आहे.
182 electric buses will run from april in beed
182 electric buses will run from april in beedsaam tv

Beed News :

एसटी बससह इतर वाहनांमुळे प्रदूषणात होत असलेली वाढ आणि वाढत्या इंधन खर्चामुळे राज्य परिवहन महामंडळाने सन 2024 अखेरीस 5 हजार पर्यावरणपूरक बस ताफ्यात दाखल करीत आहे. यापैकी बीड विभागासाठी देखील पहिल्या टप्यात म्हणजेच एप्रिलपर्यंत 55 बस दाखल होणार आहेत. (Maharashtra News)

शासनाकडून विविध योजनांद्वारे प्रवाशांना वाहतूक दरात सवलत दिली जात आहे. वाढता इंधन खर्च व पर्यावरणपूरक प्रवासासाठी बीड विभागातील 8 आगारांसाठी दोन टप्प्यांत 182 शिवाई बस दाखल होणार असल्याचे विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.

182 electric buses will run from april in beed
Lok Sabha Election 2024 : "ईव्हीएम नकाे, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या"; शरदचंद्र पवार गट आक्रमक

दरम्यान अत्याधुनिक यंत्रणा असलेली ही इलेक्ट्रिक बस एकदा चार्ज केल्यानंतर 350 ते 360 किलोमीटरपर्यंत धावणार आहे. यामुळे दिवसातून केवळ एकदा बस चार्ज करावी लागणार आहे. तसेच प्रतितास 120 किलाेमीटर अशी बसची धाव असणार आहे. इलेक्ट्रिक बसच्या तिकीटाचे दर आत्तापेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्या मार्गावर जास्त वाहतूक आहे, त्या मार्गावर बस सेवा देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, माजलगाव आगारामध्ये सर्वात अगोदर पर्यावरणपूरक बस सुविधा उपलब्ध होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

182 electric buses will run from april in beed
Bacchu Kadu : आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमचं काय जमलं असतं? राणांचा उल्लेख टाळत बच्चू कडूंनी पुन्हा भाजपला डिवचलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com