Chhatrapati Sambhajinagar Shocker Saam
महाराष्ट्र

अपघात घडला अन् पायातून रक्तस्त्राव; तरूणाचा उपचार सुरू असताना मृत्यू, नातेवाईकांना वेगळाच संशय

Chhatrapati Sambhajinagar Shocker: फुलंब्रीहून परतताना झालेल्या अपघातात तरूणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू झाला.

Bhagyashree Kamble

  • हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

  • नातेवाईकांचा आक्रोश

  • छत्रपती संभाजीनगर येथील घटना

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. रूग्णालयात उपचारादरम्यान एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. तरूणाचा भीषण अपघात झाला होता. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. रूग्णाला तातडीने व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरांवर नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. या घटनेनंतर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

ऋषिकेश अनिल गव्हाणे असे मृत तरूणाचे नाव आहे. हा तरूण छत्रपती संभाजीनगर येथील जय भवानीनगर येथील रहिवासी आहे. हा भीषण अपघात फुलंब्रीहून घरी परतताना अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, तरूण दुचाकीवरून जात होता. यादरम्यान, चारचाकीने दुचाकीला धडक दिली.

या धडकेत ऋषिकेश अनिल गव्हाणे रस्त्यावर कोसळला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल केले. सह्याद्री रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती आणखी बिघडली. तरूणाला तातडीने व्हेंटिलेटरवर हलवले.

तरूण उपचाराला योग्य प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याला वैद्यनाथ हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरूणाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रूग्णालयाबाहेर आक्रोश केला. मुकुंदवाडीतील सह्याद्री हॉस्पिटल येथील डॉक्टरांवर नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahalaxmi Rajyog: मंगळ चंद्रासोबत युती करून बनवणार खास योग; 'या' राशींवर पडणार पैशांच पाऊस

Mangalsutra Designs: लग्नसराईसाठी नविन मंगळसूत्र खरेदी करायचंय? मग ही पारंपारिक आणि ट्रेंडी डिझाईन आहेत परफेक्ट चॉईस

Maharashtra Live News Update: रिक्षा आणि खासगी वाहन चालकांचा सुटकेचा श्वास; सीएनजी गॅस सुरू

Winter Kidney Care: थंडीत कमी पाणी पिताय? किडनी आणि ब्रेन स्ट्रोकचा वाढेल धोका, तज्ज्ञांचा इशारा

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांसोबतच्या कॅबिनेट बैठकीला दांडी; शिंदे गटाच्या मंत्र्यांची नाराजीची ६ कारणे|VIDEO

SCROLL FOR NEXT