Manoj Jarange Patil 
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल

Offensive Post On Manoj Jarange Patil : 'मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर भाजप' असे फेसबुक पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे. तसंच मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात जातीयवादाचं विष पेरत असल्याचे देखील म्हटले आहे.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टद्वारे समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्यावरून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये 'मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर भाजप' असे लिहिण्यात आले. तसंच मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात जातीयवादाचं विष पेरत असल्याचे देखील म्हटले आहे.

महावितरणमध्ये अधिकारी असलेल्या प्रशांत रामकृष्ण येनगे यांनी फेसबुकवर ही पोस्ट केली आहे. मराठा समाज आणि इतर समाजामध्ये द्वेशाची आणि शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने खोटी, अफवा पसरवणारी पोस्ट त्यांनी केली आहे. प्रशांत येनगे यांच्या या पोस्टविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. भरत पुरुषोत्तम कदम यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून प्रशांत येनगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरण कार्यालय कार्यरत असलेले अतिरीक्त कार्यकारी अभियंता प्रशांत येनगे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये 'माध्यमांनीही साथ सोडली, जरांगेच्या निशाण्यावर फक्त भाजप', असे लिहिण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका करणारा असा मजकूर आणि त्यामध्ये मनोज जरांगे यांचा आणि इतर व्यक्तींचा फोटो पोस्ट केला आहे. त्याशेजारी मनोज जरांगे पाटील पलटी मारायच्या तयारीत आहे असा मजकुर आणि त्याखाली शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसंच त्याखाली 'तुतारीकडून सुपारी घेऊन महाराष्ट्रात जातीयवादाचं विष पेरणाऱ्या जरांगेला नियती धडा शिकवणार' असा मजकूर आणि त्याशेजारी मनोज जरांगे यांचा फोटो पोस्ट केला आहे.

प्रशांत येनगे यांनी खोटी आणि अफवा पसरवणारी पोस्ट ही मराठा समाज आणि इतर समाजामध्ये द्वेशाची आणि शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने फेसबुकवर शेअर केली आहे. त्यामुळे भरत पुरुषोत्तम कदम यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून प्रशांत येनगेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत येनगेंवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भरत पुरुषोत्तम कदम यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

Sanjay Raut: मुंब्रात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर!

Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

Vargamantri: निवडणुकीच्या धामधूमीत आता "वर्गमंत्री" कोण होणार? ट्रेलर आला समोर

Parineeti Chopra: नवीन चित्रपटासाठी परिणीतीचा नवा लूक, केसांना कलर देत चाहत्यांना दिली बातमी

SCROLL FOR NEXT