Pathri Gram Panchayat  Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना चपराक, यापुढे ग्रामपंचायतीची दारे बंद

Pathri Gram Panchayat Big Decision: ग्रामीण भागांमध्ये आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. अशा वृद्ध नागरिकांसाठी पाथ्री ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधून (chhatrapati sambhajinagar) महत्वाची बातमी समोर आली आहे. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना यापुढे ग्रामपंचायतीची दारे बंद राहणार आहेत. फुलंब्री तालुक्या तील पाथ्री ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता म्हातारपणात आई-वडीलांना न सांभाळणाऱ्या मुलांना आणि सूनांना चांगलीच चपराक बसली आहे. पाथ्री ग्रामपंचायतीची सध्या जिल्ह्यामध्ये सगळीकडेच चर्चा होत आहे. ग्रामपंचायतीच्या या चांगल्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागांमध्ये आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. एका वृद्ध महिलेने ग्रामपंचायत कार्यालयात मुलगा सांभाळ करत नसल्याची तक्रार केली होती. त्यामुळे जो व्यक्ती आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणार नाही त्यांना ग्रामपंचायतीचे कोणतेही कागदपत्र न देण्याचा ठराव संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथील ग्रामसभेत एकमताने पार पडला.

फुलंब्री तालुक्यात सुमारे ९२ गावे असून शेती करण्याचे प्रमाण जास्त आहे. बहुतांश नागरिक आपला उदरनिर्वाह शेतीवर करतात. ग्रामीण भागामध्ये वयोवृद्ध नागरिकाचा सांभाळ त्यांची मुले करत नसल्याने उतार वयामध्ये वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथील ग्रामपंचायत कार्यालयात मुलं सांभाळ करत नसल्याची तक्रार एका वृद्ध महिलेने केली होती. त्यामुळे ग्रामपंचायतच्या सरपंच वर्षा राजेंद्र पाथ्रीकर आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सदरील वयोवृद्ध आजीच्या मुलाची बऱ्याच वेळेस समजूत काढली. मात्र ते ऐकण्याच्या स्थितीत राहिले नाही.

अशामध्ये वयोवृद्ध नागरिकांचा उतार वयात चांगला सांभाळ व्हावा या भावनेतून शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. जो व्यक्ती आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणार नाही अशा व्यक्तीला ग्रामपंचायतीतून कुठलेही कागदपत्र दिले जाणार नसल्याचा ठराव ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे. त्याचबरोबर संबंधित माहिती तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्यामुळे शासन स्तरावर याचा विचार व्हावा या उद्देशाने आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना ग्रामपंचायतचे कागदपत्र न देण्याचा निर्धार ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी एकमुखाने घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील राजुरामध्ये मतचोरी कशी झाली?, राहुल गांधींनी सांगितली संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा बॉम्ब फुसका, भाजप नेत्याचा पलटवार

Heavy Rain : बार्शी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले; चांदनी नदीला महापूर, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

'ये तो ट्रेलर हैं' थोड्याच वेळात राहुल गांधींकडून हायड्रोजन बॉम्ब फुटणार, काय खुलासा करणार?

Purandar Fort History: ऐतिहासिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक पुरंदर किल्ला; वाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT