Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Monday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांवर भगवान महादेवाची कृपा होणार आहे. काही लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार आहेत.
Horoscope in Marathi
Horoscope Saam tv
Published On

पंचांग

सोमवार,२९ डिसेंबर २०२५,पौष शुक्लपक्ष.

तिथी-नवमी १०|१३

रास-मीन ०७|४१ नं. मेष

नक्षत्र-रेवती ०७|४१

अश्विनी ३९|०५

योग-परीघ ०७|३६

शिव २८|३१

करण-कौलव

दिनविशेष-उत्तम दिवस

Horoscope in Marathi
Home Vastu Tips: घरातील देवघरात 'या' वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा...

मेष - काहीतरी काळजीची शक्यता म्हणजे आज वाहने जपून चालवावीत. कोणाच्या सहकार्याची अपेक्षा सुद्धा नको. डोके थंड ठेवून कामे करावे लागतील. तब्येत जपा.

वृषभ - आनंदामध्ये भर घालणारी गोष्ट म्हणजे आपल्या प्रियजनांचा सहवास. तो तुम्हाला लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होणार आहेत काहीतरी. नवीन भर आयुष्यात पडेल असा दिवस आहे.

मिथुन - सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगती आहे. राजकारणामध्ये सहभाग घ्याल. आयुष्यामध्ये नवीन दिशा नवीन मार्ग सापडण्याचा आजचा दिवस आहे. करिअरच्या ठिकाणी सगळं काही ऑल इज वेल असा दिवस आहे.

कर्क - शंकर - देवांचा देव महादेव याची उपासना आज करा. भाग्यकारक घटना घडतील. अनेकांच्या सहकार्याने आणि शुभेच्छांमुळे आज प्रगतीपथावर जाण्याचे योग्य आहेत. भाग्य उजळेल.

सिंह - दैनंदिन कामांमध्ये अडथळे येतील. कदाचित रखडतील ठरवले तशा गोष्टी होणार नाहीत. वेळ आणि पैसा सुद्धा वाया जाण्याची शक्यता आहे. दिवस संमिश्र राहील.

कन्या - व्यवहारात हिशोब चोख ठेवावा लागेल. भागीदारी व्यवसायात सुयश लागेल. एखादी महत्त्वाची गोष्ट सुद्धा आज कानी येईल. इतरांना समजून घेऊन पुढे जावे लागेल.

Horoscope in Marathi
Vastu Tips: या पर्सनल गोष्टी इतरांसोबत कधीही शेअर करू नका, अन्यथा...

तूळ - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. गुप्त शत्रूंचा त्रास होईल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. धन मिळेल पण त्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागतील.दिवस बरा आहे.

वृश्चिक - हाती घेतलेल्या कामांमध्ये सुयश लाभणार आहे. कुलस्वामिनीची उपासना करावी. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. लॉटरी मध्ये नशीब आजमावयाला हरकत नाही .

धनु - चतुर्थ स्थान हे सुखाचे स्थान आहे. आज मात्र थोडा अलर्ट सिग्नल म्हणजे कुठे जमिनीच्या कामात कोणाला जामीन राहू नका. महत्त्वाची कामे करत असताना चार वेळा विचार करून निर्णय घ्या. दिवस बरा.

Horoscope in Marathi
Vastu Tips : कोणत्या दिवशी आर्थिक व्यवहार करणे टाळावे? जाणून घ्या

मकर - मुला मुलींचे प्रश्न मार्गी राहील लागतील. आर्थिक क्षेत्रामध्ये एखादं धाडसही कराल. सुनियोजित गोष्टींमधून लाभ होण्याचा आजचा दिवस आहे. स्वतःचा पराक्रम वृद्धिंगत होईल.

कुंभ - मनामध्ये आशावाद आहे तर जगण्याला उमेद आहे. हे जाणवेल कुटुंबीयांमध्ये महत्त्वाचे जबाबदारीची उचलावी लागेल. काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतील आणि अंदाजही अचूक ठरतील. दिवस चांगला आहे.

मीन - तब्येतीच्या आज काही तक्रारी राहतील असं वाटत नाही. दिवसांमध्ये कामाचे नियोजन चांगलं राहील .उत्साह व उमेद वाढवणाऱ्या घटना आज घडणार आहेत.आपले व्यक्तिमत्व आकर्षक वाटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com