Chhatrapati Sambhaji nagar : २ मुलांचा खर्च झेपेना, माफी मागितली! चिठ्ठीत व्यथा मांडून हतबल बापानं शिवारातच संपवलं आयुष्य

Chhatrapati Sambhaji Nagar News : मुलांच्या शिक्षणाचा खर्च झेपत नाही, त्यामुळं हतबल झालेल्या शेतकऱ्यानं शिवारातच आपलं आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली.
Maratha Reservation Latest News:
Maratha Reservation Latest News: Saamtv
Published On

छत्रपती संभाजीनगर, ता. २७ जून २०२४

दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून शेतकऱ्यानं आपलं आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. लाडसावंगी येथे गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

बाबासाहेब पडूळ असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. पडूळ हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे २० गुंठे शेतजमीन आहे. या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे.

Maratha Reservation Latest News:
Sanjay Raut News : 'मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक नाही', ठाकरेंचं नाव घेत संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान!, VIDEO

पडूळ हे अल्पभूधारक शेतकरी असून, ते पत्नी एक मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत लाडसावंगी येथे राहत होते. ते गुरुवारी सकाळी साधारण सहा वाजता शेतावर गेले. शेतावरील जनावरांना चारा देण्यात जात असल्याचं त्यांनी घरातल्यांना सांगितलं होतं. काही वेळानं त्यांचे भाऊ रामू पडूळ हे शेतावर गेले. तिथं बाबासाहेब हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ घरी कळवले. पडूळ यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी तपासणी केली. त्यांनी पडूळ यांना मृत घोषित केले. या घटनेने पडूळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Maratha Reservation Latest News:
Pune Accident News: पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅक्टर- कारची समोरासमोर धडक; १ ठार, ३ जखमी

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तिथं मोठी गर्दी केली. या घटनेनं गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Maratha Reservation Latest News:
Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार? कोणता मुद्दा गाजणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com