Marathwada Water Scarcity : पावसाळ्यातही नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरूच; अजूनही १६२८ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा

Sambhajinagar News : मे महिन्याच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १८ मेपर्यंत १८३७ पर्यंत टँकरचा आकडा होता.
Marathwada Water Scarcity
Marathwada Water ScarcitySaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला. धरणातील पाणीसाठा आटल्याने पाणी टंचाई अधिक तीव्र स्वरूपात जाणवत होती. यामुळे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र पावसाळा सुरु झाल्यानंतर देखील पाणी टंचाईच्या झळा कमी झालेल्या नसून आजही मराठवाड्यातील १ हजार ६२८ गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरु आहेत. 

Marathwada Water Scarcity
ZP School : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळले; विद्यार्थी थोडक्यात बचावले

मराठवाड्यात पावसाने जून महिन्यातील सरासरी (Sambhajinagar) गाठल्याचे आकडे सांगत असताना एकूण लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक अजूनही टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहेत. पावसाळा सुरू झाला तरीही मराठवाड्यात पावसाळ्यात १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी पुरवठा (Water Scarcity) सध्या सुरू असून नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे. विभागात पाणी टंचाईचे संकट कमी होत लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांत सुमारे १५ टक्के जलसाठा आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १८ मेपर्यंत १८३७ पर्यंत टँकरचा आकडा होता. आता १९ जूनपर्यंत १९३८ टँकरचा आकडा आहे. २४ जून पर्यंत १६९६ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. 

Marathwada Water Scarcity
Dhule News : कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या ३५ बुलेट जप्त; धुळे वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई

मराठवाड्यात पाऊस (Rain) बरसत असला तरी मोठ्या, लघू आणि मध्यम प्रकल्पांत साठा नसल्यामुळे पाणी टंचाईचे सावट कायम आहे. विभागाच्या वार्षिक ६७८ मि.मी. सरासरीच्या तुलनेत १६९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान सद्यस्थितीला ११६५ गावे आणि ४९३ वाड्यात टंचाई असून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शिवाय ३ हजार ९४२ विहिरीचे अधिग्रहण कायम आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com