Dhule News : कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या ३५ बुलेट जप्त; धुळे वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई

Dhule News : शहरातील रस्त्यांवरून बुलेटची फायरिंग बदलवून सुसाट वेगाने गाड्या चालविल्या जातात. शिवाय फटाके फोडणाऱ्या गाड्या देखील रस्त्यावरून जाताना दिसतात
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : धुळे शहर वाहतूक पोलिसांतर्फे कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आज शहरातील विविध मुख्य चौकांमध्ये वाहतूक पोलिसातर्फे कारवाई करत ३५ बुलेट पोलिसानं जप्त केल्या आहेत.

Dhule News
Pimpri Chinchwad News : कारंज्याच्या पाणी साठ्याच्या टाक्यांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आहेत टाक्या

शहरातील रस्त्यांवरून बुलेटची फायरिंग बदलवून सुसाट वेगाने गाड्या चालविल्या जातात. शिवाय फटाके फोडणाऱ्या गाड्या देखील रस्त्यावरून जाताना दिसतात. कर्णकर्कश्य आवाज करून फटाक्याप्रमाणे आवाज करून कानाला इजा पोहोचेल असे आवाज या बुलेट्स मधून निघत असल्याने अशांविरोधात (Dhule) धुळे वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. 

Dhule News
ZP School : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळले; विद्यार्थी थोडक्यात बचावले

प्रत्येकी एक हजाराचा दंड 
वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) जवळपास ३५ बुलेटवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व बुलेटचे सायलेन्सर काढण्यात आले असून, संबंधित बुलेट धारकांवर एक हजार रुपये प्रमाणे दंड देखील आकारण्यात आला आहे. त्याचबरोबर ही कारवाई यापुढे देखील अशाच प्रकारे सुरू ठेवणार असल्याचे धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com