छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू

Fire Broke Out In Garment Shop: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Rohini Gudaghe

Chhatrapati Sambhajinagar Fire Update

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Fire) आज (३ एप्रिल) पहाटे धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील छावणी परिसरातील एका कपड्याच्या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या एकाच कुटुंबातील ७ सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी परिसरात छावणी दाना बाजार गल्लमध्ये महावीर जैन मंदिरच्या बाजूला हे कपड्याचं दुकान होतं. या दुकानात पहाटे अचानक आग लागली. या आगीमुळे सात जणांचा मृत्यू (Sambhajinagar Fire) झालाय. मृतकांमध्ये दोन मुले, दोन पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुकानामध्ये नेमक्या कोणत्या कारणाने आग लागली, हे अजून समजलेलं नाही. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव (Fire Broke Out In Garment Shop) घेतली. नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं. हे दुकान छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ आहे. ही एक तीन मजली इमारत (fire news) आहे.

आसिम वसीम शेख (3 वर्ष मुलगा), परी वसीम शेख (2 वर्ष मुलगी), वसीम शेख (30 वर्ष), तन्वीर वसीम ( महिला 23 वर्ष), हमीदा बेगम (50 वर्ष), शेख सोहेल (35 वर्ष), रेश्मा शेख (22 वर्ष) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

आगीचं स्वरूप अतिशय भीषण (Chhatrapati Sambhajinagar Fire Update) होतं. त्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दल पोहोचेपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला होता. सर्व मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते. आता त्यांचे मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत (Chhatrapati Sambhajinagar News) आहेत. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे स्थानिकांमधून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT