Chhatrapati Sambhajinagar Crime News collage girl ended her life in Harsul area Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News: 'मम्मी पप्पा सॉरी मला डोकेदुखी असह्य झाल्याने मी...', तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Sambhajinagar Crime News: डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे एका तरुणीने घरातील सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

Satish Daud

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे एका तरुणीने घरातील सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना मंगळवारी दुपारसच्या सुमारास शहरातील हर्सूल सावंगी परिसरात घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

प्रिया रमेश बुजडे या तरुणीचे नाव आहे. ती शहरातील (Chhatrapati Sambhajinagar) एका विद्यालयात फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती. प्राप्त माहितीनुसार, गेल्या 20 दिवसांपासून प्रियाचे डोके दुखत होते. तिच्यावर रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले.

मात्र, डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे प्रियाने घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. दरम्यान, आत्महत्येपूर्वी प्रियाने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली. आई-बाबा मला माफ करा मी चुकीचे करतेय, डोकेदुखी असह्य झाल्याने मी आत्महत्या करत आहे. असं प्रियाने चिठ्ठीत नमुद केलं.

दरम्यान, प्रियाच्या कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना (Police) दिली. घटनेची माहिती मिळताच हर्सूल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रियाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला

SCROLL FOR NEXT