Mumbai Airport News: उड्डाण भरणाऱ्या विमानाला ट्रकची धडक; मुंबई विमानतळावरील थरारक घटना

Truck Hit Plan Mumbai Airport: मुंबई विमानतळावरून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. धावपट्टीवरून उड्डाण भरणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानाला एका टो-ट्रकने धडक दिली.
vistara aircraft plan engine hit by tow truck Mumbai airport  shocking incident
vistara aircraft plan engine hit by tow truck Mumbai airport shocking incidentSaam TV
Published On

Mumbai Airport News: मुंबई विमानतळावरून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. धावपट्टीवरून उड्डाण भरणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानाला एका टो-ट्रकने धडक दिली. या विमानातून 140 प्रवाशी प्रवास करीत होते. ट्रकची धडक बसताच पालटने सतर्कता दाखवत वेळीच विमानाचं उड्डाण रोखलं. यामुळे पुढील अनर्थ टळला.

vistara aircraft plan engine hit by tow truck Mumbai airport  shocking incident
Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ; 'त्या' ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, विमानाच्या इंजिनचं मोठं नुकसान झालं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. एएनआयच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान मुंबईहून कोलकात्ताला जाणार होतं.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबई विमानतळावरून 140 प्रवाशांना घेऊन विमान उड्डाण करणार होते. यावेळी एका टो ट्रकने विमानाला धडक दिली. ट्रक विमानाला धडकल्याने इंजिनला आग लागण्याचा धोका होता.

मात्र, पायलटने सतर्कता दाखवल्याने पुढील दुर्घटना टळली. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. हा अपघात झाला तेव्हा विमानात 140 प्रवासी होते. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, विमानातील प्रवाशांना खाली उतरवून दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आलं.

घटनेबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई-कोलकाता टेक-ऑफ फ्लाइटला विमानतळावरील ग्राउंड सर्व्हिस उपकरणाची (टो ट्रक) धडक बसल्याने एका इंजिनचे नुकसान झाले. विमानाची आवश्यक तपासणी आणि दुरुस्ती केली जात आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com