MLA Sanjay Shirsat News Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News : मोठी बातमी! शिवसेना गटातील आमदाराच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

MLA Sanjay Shirsat News : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे.

Satish Daud

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे. बाबा पेट्रोल पंपाजवळील महावीर चौकात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ (MLA Sanjay Shirsat) आपल्या कुटुंबियांसोबत कारने कामानिमित्त बाहेर गेले होते. तेथून परतत असताना त्यांची कार रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील बाबा पेट्रोल पंपाजवळ आली.

यावेळी बाबा पेट्रोल पंपाजवळ (Chhatrapati Sambhaji Nagar News) काही लोकांचे भांडण सुरू होते. ही भांडणे सोडवण्यासाठी आमदार संजय शिरसाठ यांनी कार थांबवली. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने आमदार शिरसाठ यांच्या कारवर दगड फेकला.

यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हा प्रकार कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आमदार शिरसाठ यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगी आणि मुलगा देखील होते. दरम्यान, घटनेनंतर शहरातील शिवसैनिकांनी बाबा पेट्रोल पंपाकडे धाव घेतली.

यामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी गर्दी पांगवत शिवसैनिकांना घरी जाण्याचं आवाहन केलं. आमदार महोदयांच्या कारवर नेमका दगड कुणी भिरकावला याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: शाळेसाठी दररोज ६ किमी पायपीट; शेतातही केले काम; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Saturday Horoscope: पाच राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; होणार धन वर्षाव, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Bhadrapada Amavasya 2025: आजच्या शनी अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या; 'या' चुका करणं टाळा

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Latur: मिरवणुकीदरम्यान बैल अचानक उधळला, ग्रामस्थ सैरावैरा पळू लागले; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT