Manoj Jarange Maratha Reservation News Saam TV
महाराष्ट्र

VIDEO : मनोज जरांगे उपचार घेत असलेल्या रुग्णालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला; संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडतंय?

Manoj Jarange Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Satish Daud

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपचार घेत असलेल्या रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यातील ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण संघर्ष, सोशल मीडियामध्ये सुरू असलेला वाद आणि भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

सगेसोयरेच्या मागणीसाठी उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी येथे जाणार आहेत. पोलिसांनी अंतरवाली सराटी, वडीगोद्री येथील बंदोबस्त देखील वाढवला आहे. दरम्यान, सोमवारी देखील छत्रपती संभाजीनगर शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

कारण, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणारे डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला मराठा संघटनांनी काळे फासलं होतं. मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाला विरोध करत डॉ. तारख यांनी अर्ज दिला होता. यावरून मराठा संघटना आक्रमक झाल्या.

झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट तारख यांची भेट घेऊन आधी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळे फासले. या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friendship songs: तुमच्या मित्रासाठी या फ्रेंडशिप डेला डेडिकेट करा ही हटके गाणी

Pandharpur News : पंढरपूरमध्ये बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाचा छापा; ११ लाखांचा साठा जप्त

Moto G86 Power 5G: दमदार बॅटरी आणि कॅमेरासह हा फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढल्याने बैलगाडा शर्यतीवर बंदी...

महिला कॉन्स्टेबलला शिपाई नवऱ्यानंच संपवलं, शेतात नेत डोक्यात घातला रॉड; कारण..

SCROLL FOR NEXT