Eknath Shinde VIDEO: अमली पदार्थांशी संबधित अवैध बांधकामावर बुलडोझर फिरवा, CM शिंदेंचे पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश

CM Eknath Shinde on Pune Drugs Case : अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश
CM Eknath Shinde on Pune Drugs Case
CM Eknath Shinde on Pune Drugs CaseSaam TV
Published On

मागील काही दिवसांपासून राज्यात अंमली पदार्थ सेवन आणि तस्करीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील एका पबमध्ये काही तरुण-तरुणी सर्रास ड्रग्जचे सेवन करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले, अशी टीका विरोधक करीत आहेत.

अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या पुण्यातील अवैध बांधकामावर बुलडोजर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या आदेशानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत.

शहरात अमली पदार्थ संबधित सुरू असलेल्या काही अवैध्य बांधकामावर बुलडोजर फिरवला जाणार असल्याची माहिती आहे. पुणे शहरातील एका पब्जमध्ये तरुण-तरुणी ड्रग्ज घेत असलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर पुण्यात ड्रग्जच्या मुद्यावरून पुन्हा वातावरण तापलं आहे.

CM Eknath Shinde on Pune Drugs Case
Maharashtra Politics : राज्यात शरद पवार पुन्हा राजकीय भूकंप घडवणार? अजितदादांच्या आमदारांना पक्षात मिळणार एण्ट्री?

ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षकासह चौघांना निलंबित करण्यात आलंय. त्याचबरोबर या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक देखील करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत पाठवलं आहे. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाच्या घटनेमुळे विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

"पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत", असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहेत.

CM Eknath Shinde on Pune Drugs Case
Pune Drug Party Case : पुण्यातील एल३ पब प्रकरणी मोठी कारवाई, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक निलंबित

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com