Chhatrapati Sambhaji Nagar Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar: रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या व्यक्तीला कारने चिरडले, घटना CCTV मध्ये कैद

Sambhajinagar Car Accident: छत्रपती संभाजीनगरच्या वाळुज परिसरामध्ये हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. भरधाव कारने एका व्यक्तीला चिरडले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) हिट अँड रनची घटना समोर आली आहे. संभाजीनगर शहरातील वाळुज परिसरामध्ये ही घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या व्यक्तीला भरधाव कारने चिरडले. या अपघातामध्ये ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. या अपघाताचा तपास वाळुज पोलिसांकडून सुरू आहे.

ठाण्यामध्ये देखील हिट अँड रनची घटना घडली. ठाण्यातल्या वर्तकनगरमधील कोसर भागामध्ये बुधवीरी ही घटना घडली. भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये डंपर अंगावरून गेल्यामुळे ठाणे क्राईम ब्रँचच्या पोलिस कॉन्स्टेबल आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सुनील रावते (४४) असे मृत पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून ते ठाणे क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत होते. या अपघाताचा तपास ठाणे पोलिसांकडून सुरू आहे.

तर पुण्यामध्ये हिट अँड रनची घटना घडली. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात भीषण अपघात झाला. गंगाधाम चौकात भरधाव ट्रकने महिलेला धडक दिली. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT