Thane Hit and Run Case: ठाण्यात भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले, पोलिस कॉन्स्टेबलसह महिलेचा जागीच मृत्यू

Thane Dumper Two Whealer Accident Case: ठाण्यामध्ये हिट अँड रन प्रकरण समोर आले आहे. भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्य पोलिस कॉन्स्टेबलसह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Thane Hit and Run Case: ठाण्यात भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले, पोलिस कॉन्स्टेबलसह महिलेचा जागीच मृत्यू
Thane AccidentSaam Tv
Published On

विकास काळे, ठाणे

ठाण्यामध्ये डंपरच्या धडकेमध्ये पोलिस कॉन्स्टेबलचा (Police Constable) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातल्या वर्तकनगरमधील कोसर भागामध्ये ही घटना घडली. भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये डंपर अंगावरून गेल्यामुळे ठाणे क्राईम ब्रँचच्या पोलिस कॉन्स्टेबल आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा तपास ठाणे पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या वर्तकनगरमधील कोसर भागात बुधवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर दुचाकीवरील दोघेही जण खाली पडले. डंपरने चिरडल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये पोलिस कॉन्स्टेबलचा आणि एका महिलेचा समावेश आहे. सुनील रावते (४४) असे मृत पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून ते ठाणे क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत होते.

Thane Hit and Run Case: ठाण्यात भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले, पोलिस कॉन्स्टेबलसह महिलेचा जागीच मृत्यू
Thane News: फी न भरल्यामुळे १०० विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढलं, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

सुनील रावते यांच्यासोबत दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा देखील अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ठाण्याच्या वर्तकनगर भागात सुनील रावते हे राहत होते. ते ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनीटमध्ये कार्यरत होते. बुधवारी सकाळी ते एका महिलेच्या दुचाकीवरून खासगी कामासाठी जात होते. त्याचवेळी डंपरच्या चाकाखाली आल्याने सुनील रावते आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला.

Thane Hit and Run Case: ठाण्यात भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले, पोलिस कॉन्स्टेबलसह महिलेचा जागीच मृत्यू
Mumbai Crime : लेकीच्या बचावासाठी आईनं घातली त्याच्यावर वाघिणीसारखी झडप; मुलीची छेड काढणाऱ्याला दाखवला इंगा

हा अपघात नेमका कसा झाला आहे हे अद्याप कळू शकले नाही. अपघाताची नोंद वर्तकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. सुनील रावते यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुले असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून ते राहतात त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Thane Hit and Run Case: ठाण्यात भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले, पोलिस कॉन्स्टेबलसह महिलेचा जागीच मृत्यू
Thane: आधी फी मगच शाळा? ठाण्याच्या पोलिस स्कूलमधील धक्कादायक प्रकार, 100 विद्यार्थ्यांना बाहेर काढल्यानं संताप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com