Thane: आधी फी मगच शाळा? ठाण्याच्या पोलिस स्कूलमधील धक्कादायक प्रकार, 100 विद्यार्थ्यांना बाहेर काढल्यानं संताप
ठाणे : फी न भरल्यानं शाळेच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातून समोर आला आहे. दरम्यान, फी भरण्यासाठी दोन दिवस बाकी असतानाही शाळेच्या व्यवस्थापनानं केलेल्या कृतीवर पालकांनी संपात व्यक्त केला आहे. ठाणे पोलिस स्कूलमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. जवळपास 100 विद्यार्थी यामध्ये भरडले गेलेत. शाळेने दिलेल्या फी भरण्याच्या ॲप मध्ये 12 तारीख शेवटची होती. असं असतानाही शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं. दरम्यान सकाळी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर थोड्याच वेळात पालकांना शाळेतून फोन गेले आणि तुमच्या पाल्यांची फी भरली नसल्याने तुम्ही त्यांना घेऊन जा, असा निरोप शाळेकडून देण्यात आला. यामुळे पालकांनी शाळेभोवती गराडा घातला. तरी देखील शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच व्यवस्थापकांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही.. या घटनेनंतर युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक यांनी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे विचारणा केली. मात्र त्यांनी जबाबदारी झटकली असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, या बाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही सांगितलं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.