Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Nagar: आधी ३० मिनिटं केली रेकी, अवघ्या 15 सेकंदांत तरुणाला कारमध्ये कोंबले; संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगरमध्ये भरदिवसा एका तरुणाचे अपहरण झाले आहे. अवघ्या १५ सेकंदात या तरुणाने कारमध्ये कोंबून नेण्यात आले.

Siddhi Hande

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. संभाजी नगरमध्ये भर दिवसा एका तरुणाचे अपहरण केले आहे. छत्रपती संभाजी नगरमधील मुख्य चौकांपैकी एक म्हणजे सिटी चौक. याच चौकात भरदिवसा सराफा कामगार तरुणाचे अपहरण करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु पोलिसांच्या मदतीने या तरुणाला शोधण्यात यश आले.

सराफा कामगाराचे भरदिवसा अपहरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळ गाठले. यावेळी अपहरण करणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल पडला होता. याच मोबाईलवरुन पोलिसांनी फोन केला. त्या मोबाईल नंबरचे लोकेशन मिळवण्यात पोलिसांना यश आले आणि त्यांनी या तरुणाची सुटका केली.

पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील तरुणाने संभाजी नगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला सोन्याचे दागिने घेण्यासाठी ८ लाख रुपये दिले होते. त्याने आधी सोन्याचे दागिने देतो म्हणून सांगितले. मात्र, त्या व्यक्तीने दागिने दिलेच नाही. दावरवाडी येथील तरुणाने पैसे परत मिळवण्यासाठी अनेकदा कॉल केले. त्यांनी तब्बल ६ महिने त्या सराफा कामगाराला फोन केला.

दरम्यान, वारंवार फोन करुन, पाठपुरवठा करुनदेखील तो व्यक्ती पैसे देत नव्हता. त्यामुळे त्याने या तरुणाच्या अपहरणाचा कट रचला. ठरल्याप्रमाणे त्या व्यक्तीने काही साथीदारांच्या मदतीने अपहरणाचा कट आखला. ही घटना सिटी चौक परिसरातील मीना फंक्शन हॉलच्या मागील गल्लीमध्ये घडली. याप्रकरणी रात्री उशिरा सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : महाराजांच्या भक्तीला विरोध केला, पोटच्या पोरानं जन्मदात्या वडिलांना संपवलं; धाराशिवमध्ये खळबळ

Maharashtra Live News Update: अमरावतीतील भातकुलीत पूर, गावाचा संपर्क तुटला

Monday Horoscope : सोमवार जाणार ४ राशींसाठी लाभाचा, बढतीचे योग आणि कटकटी मिटणार

Election Commission : मतदारांची वेगळी यादी देणं शक्य होणार नाही; निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टाला उत्तर, VIDEO

Chess Cake Recipe: बाहेरचा चिज बर्गर कशाला? घरीच करा मऊसुत टेस्टी चीज केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT