
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे धंद्यात पार्टनर असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांचे कोणत्या कंपन्यांमध्ये पार्टनरशीप आहे? कुठे किती मालमत्ता आहे? त्याबद्दल आपण स्पेशल रिपोर्टद्वारे जाणून घेणार आहोत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष केलं आहे. तर खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पार्टनरशीपची माहितीच जाहीर करत दमानियांनी खळबळ उडवून दिली.
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. जगमित्र शुगर्सची 88 एकर 34 गुंठे जमीनीत कराड- मुंडे पार्टनर आहेत. जगमित्र शुगर मिलमध्ये राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक आहेत. व्यंकटेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये राजश्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकत्र आहेत. 2022 मध्ये कंपनीचा नफा 12 कोटी 27 लाख रुपये झाला. कंपनीने 2022 मध्ये अखेरची बॅलन्सशीट भरली.
इंडिया सिमेंट कंपनीची फ्लाय अॅशच्या वाहतूकीतही कंपनीचा सहभाग असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. एवढंच नाही तर महाजनको या कंपनीकडूनही जबरदस्तीने कंत्राट मिळवल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. हे असं असलं तरी हे संतोष देशमुख हत्या प्रकरण धसास लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीची यादीच वाचलीय.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड एसआयटी कोठडीत आहे. तर याच वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेंसोबतचे व्यावसायिक संबंध समोर येत असल्याने मुंडेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंची गच्छंती करणार की त्यांना अभय देणार? याकडे लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.